बेळगाव सोडा, ठाकरे घराबाहेर पडत नाहीत:पुढच्या राज्यसभेसाठी राऊतांची काँग्रेससमोर गुलामगिरी सुरू, मराठी अस्मितेवर दुहेरी भूमिका- नवनाथ बन

0
new-project-2026-04-28t115726138_1777617251.jpg




महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे, हा राज्य सरकारचा आग्रह आहे. पण स्वत:च्या मुलांना आण नातवांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकवणाऱ्या नेत्यांना राऊत हा कानमंत्र देणार आहेत का? उद्धव ठाकरेंना जाब विचारणार का? उद्धव ठाकरेंनी मुलांना तिथे का शिकवले असा सवाल त्यांना करणार का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही, वाकला नाही. पण उद्धव ठाकरे, संजय राऊत उबाठा सत्तेसाठी सोनिया गांधीसमोर झुकला, राहुल गांधीसमोर वाकला हे महाराष्ट्राने 2019 मध्ये पाहिले आहे. तुम्ही सत्तेसाठी राहुला गांधी यांची चाकरी करण्याचे काम केले. तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलू नये. ठाकरे घरातूनच बाहेर पडत नाही नवनाथ बन म्हणाले की, बेळगावसाठी भाजपने आणि फडणवीस सरकारने काय केले हा प्रश्न विचारण्यापूर्वी संजय राऊत यांनी आता कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला प्रश्न केला पाहिजे. कर्नाटक सरकारकडून मराठी माणसांवर जे अत्याचार झाले त्यासंदर्भात राऊत राहुल गांधींना एखादे पत्र लिहणार आहेत का? तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारतात. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना कधी का वाटले नाही की बेळगावला जात मराठी माणसांची भेट घेतली पाहिजे. ते बेळगाव सोडा इथे घरातूनच बाहेर पडत नाहीत. आज कर्नाटकमधील काँग्रेस सरकार मराठी माणसांवर अन्याय करते आहे. तुम्ही राहुल गांधी यांना जाब विचारला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी एकही प्रश्न का सोडवला नाही हा प्रश्न मातोश्रीवर जात विचारा. राऊतांना केवळ हुजरेगिरीला स्कोप नवनाथ बन म्हणाले की, जनाब संजय राऊत महाराष्ट्रातील जनतेने तुमचा स्कोप आणि स्केल ठरवून टाकलेला आहे. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्हाला भोपळा दिला आहे. तोच तुमचा स्कोप आणि स्केल आहे, हे महायुती, भाजपने नाही जनतेने दाखवून दिले आहे. कोणत्याही पक्षाला जनतेने स्कोप दिलेला असतो तो तुम्ही दिलेला नाही. तुम्हाला हुजरेगिरीला स्कोप आहे म्हणून तुम्ही आजपर्यंत एकही निवडणूक लढले नाही, असा टोला बन यांनी लगावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीला अजून साडेपाचशे दिवस नवनाथ बन म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीला साडेपाचशे दिवस बाकी आहे असे म्हणत संजय राऊत आता आपला एकएक दिवस मोजत आहेत. राऊतांना माहिती आहे की आता राज्यसभेची उमेदवारी काँग्रेस मागणार आहे. कारण मविआतील शरद पवार आणि उबाठाला संधी देण्यात आली आहे. काँग्रेसची चाटुगिरी करत ते राज्यसभेच्या जागेवर जाणार आहेत. पण त्यासाठी त्यांना काँग्रेसची गुलामगिरी जोरात करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed