पोलीस दलातील ११ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात – VastavNEWSLive.com

0
WhatsApp-Image-2026-04-30-at-18.54.23.jpeg


नांदेड : पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित समारंभात दीर्घकालीन सेवा पूर्ण केलेल्या ११ अधिकारी-अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. समारंभास अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव  यांच्या हस्ते निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम मंथन हॉल येथे पार पडला.

सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांची नावे

यामध्ये खालील अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त झाले :

  1. संजीवन विष्ठलराव मिरकले
  2. संजय शंकरराव चिटसावर
  3. श्रीमती श्रीमंत आठवले
  4. साहेबराव आलू आडे
  5. माधव मनोहरराव पळसवाड
  6. शेख अहमद कालेजी
  7. किशन दिगांबर केंदे
  8. सुभाष मारोती हमदे
  9. शिवाजी विश्वनाथ सूर्यवंशी
  10. साजेदअली विलायकतअली सय्यद
  11. भास्कर संभाजी केंदे

पोलीस अधीक्षकांनी आपल्या मनोगतात निवृत्त कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेत कुटुंबासोबत आनंदी जीवन व्यतीत करावे, असा सल्ला दिला. उपस्थित अधिकारी व अंमलदारांनी निवृत्त सहकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस कल्याण विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आयोजन पोलीस कल्याण विभागामार्फत करण्यात आले.


Post Views: 93






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed