शालेय संस्कार हे केवळ शिक्षणापुरते नाही तर आयुष्यभराचा अमूल्य ठेवा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे मेळाव्यात मनोगत‎

0
240_177754928769f33fe7f1907_90c000b72f004.jpg



शालेय जीवनात मिळणारे संस्कार हे व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर आणि जबाबदारी यासारख्या मूल्यांची शिकवण शाळेतच मिळते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबतचे अनुभव यामुळे जीवनाकडे सकारात्मक

.

शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक संघाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मंगल सोनोने होते.

यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपण महाविद्यालयात घालवलेल्या तीन वर्षात आपण खूप काही मूल्य व संस्कार शिकलो, ज्याचा वापर आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. व त्यामुळे खऱ्या अर्थाने अतिशय समाधानाने व संस्कारशील जीवन जगत आहोत अशी ग्वाही दिली. प्रास्ताविक व आभार संघटनेचे सचिव प्रा. डॉ. शिवाजी नागरे यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य साबू यांनी सांगितले की, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक संघटना ही स्वायत्त संघटना असून ही संघटना आपल्या स्तरावर महाविद्यालयांसाठी कुठलाही प्रकारचे कार्य करू शकते. केवळ आर्थिक मदतच नव्हे तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काही चांगल्या कल्पनांच्या सूचना किंवा विविध कंपन्यांमध्ये एच. आर. या पदावर कार्यरत होत असलेले विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतींचे आयोजनही केले जाऊ शकते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मंगल सोनवणे यांनी माजी विद्यार्थी संघटना कोणत्या ध्येय व उद्दिष्टासाठी स्थापन करण्यात आले त्याची उजळणी केली. तर संघटनेचे कोषाध्यक्ष संदीप कोगदे यांनी आपल्या महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना संपूर्ण महाविद्यालय दाखवण्यात आले. प्रा. डॉ. शिवाजी नागरे, प्रा. डॉ. विवेक माने, प्रा. डॉ. पीयूष नाल्हे, प्रा. डॉ. नितीन सुरडकर या माजी विद्यार्थी शिक्षक, पालक समितीच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed