देवपिंपरी-मोहाडी रस्त्याच्या कामामध्ये अडथळा:ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे, स्मारक,काेंडवाड्याच्या ठरावावरून‎खडाजंगी; सभेत 51 विषयांना मंजुरी‎

0
246_177755309769f34ec94eeee_cabd6b5f6c79418fac320fd879d32231v1.jpg




तालुक्यातील देवपिंपरी ते मोहाडी या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रुंदीकरण व डांबरीकरण केले जात आहे. या रस्त्यालगत शेती असलेल्या जळगाव येथील व्यापाऱ्याने रस्त्याच्या कामात अडथळा आणला आहे. याबाबत देवपिंपरी ग्रामपंचायततर्फे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले आहे. देवपिंपरी ते भवानी फाटा रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दैनावस्था झाली होती. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सदर रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणास मंजुरी मिळाली आहे. सदर रस्त्याचे काम सुरू झाले असून याच रस्त्यालगत शेती असलेले जळगाव येथील व्यापाऱ्याने अडथळा निर्माण केला आहे. याबाबत देवपिंपरी ग्रामपंचायत तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देत अडथळा दूर करण्याबाबत विनंती केली आहे. त्याचबरोबर अडथळा दूर न झाल्यास ग्राम पंचायतीतर्फे तक्रार करणार असल्याचा इशारा सरपंच तुकाराम निकम यांनी दिला आहे. पूर्वीपासूनच रस्ता अस्तित्वात ^देवपिंपरी पासून भवानी फाट्यापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण सुरू आहे. असे असताना संबधित शेत मालकाने त्यांच्या शेताजवळील रुंदीकरणास अडथळा निर्माण करून काम थांबविले आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा. -तुकाराम निकम, सरपंच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed