हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात:पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला होता इशारा

0
whatsapp-image-2026-05-01-at-75456-am_1777603606.jpeg




हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गोरेगाव पोलिसांनी शनिवारी तारीख एक पहाटेच ताब्यात घेतले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिला आहे हिंगोली जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारची भर पडलेली नाही. जिल्हा नियोजनचा निधी अर्थपूर्ण चर्चा करून वाटप केला जातो. किती निधी आला तसेच काय विकास कामे झाली याची कुठलीही माहिती मिळत नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे ऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. याशिवाय पालकमंत्री नरहरी झिरवळ यांचे अनेक कारनामे मागील काही दिवसात उघड झाले. यामध्ये हिंगोली जिल्ह्याची बदनामी झाली. या प्रकारामुळे निष्क्रिय पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिला होता. संघटनेच्या या आंदोलनाचा धसका घेत पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांची शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर आज सकाळी गोरेगाव पोलिसांनी मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसवले. याशिवाय इतर कार्यकर्त्यांचा देखील पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दरम्यान शेतकरी, पिकविमा, कर्जमाफी, पाणीप्रश्न, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्यांना अडवायचचे आणि केवळ आश्वासनांची खैरात करून जनतेची दिशाभूल करणारे मंत्री मात्र मोकळेपणाने फिरणार..? हा कुठला लोकशाहीचा न्याय आहे? असा सवाल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी केला आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटना कधीही अन्यायासमोर झुकणार नाही.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या क्रांतिकारक शेतकऱ्यांच्या मुलांना नजरकैदेत ठेवून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र आमचा संघर्ष थांबणार नाही, उलट अधिक तीव्र होईल असा इशाराही त्यांनी दिला. वेळप्रसंगी मुंबई येथे जाऊन पालकमंत्र्यांना जाब विचारला जाईल असा इशाराही कावरखे यांनी दिला आहे.पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, पिकविमा, हळद दर प्रश्न, हळद खरेदी बंद आहे त्यावर प्रश्न विचारणा करणार,अन्न आणि प्रशासन विभागाचे कार्यालय अद्यापही परभणी मध्ये आहे ते हिंगोली मध्ये कधी होणार?यावर प्रश्न विचारणार, रस्ते आणि भ्रष्टाचार यावर पालकमंत्र्यांना उत्तर द्यावेच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed