हिंगोली जिल्हा परिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर:सोईओ विवेक गायकवाड यांचा पुढाकार, 248 जणांची तपासणी

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-30t214245456_1777565599.jpg




शासकीय कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी ता २९ येथील नक्षत्र सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ​जिल्हा परिषदेमध्ये आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. प्रकाश जाधव यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. ​या ​शिबिरामध्ये एकूण २४८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकाद्वारे करण्यात आली. तपासणी मध्ये आढळलेले नवीन रुग्णांमध्ये १६ जणांना उच्च रक्तदाब 12 जणांना मधुमेह,18 जणांना रक्तक्षय आढळला. तसेच चार संशयतांचे इसीजी काढण्यात आले. तपासणीत आढळलेल्या नवीन रुग्णांना पुढील उपचारासाठी आणि जीवनशैलीत बदल करण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून मार्गदर्शन करण्यात आले. ​या शिबिरामध्ये डॉ. जहीरखान, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभदा तांबिले, डॉ. साक्षी मार्कड, डॉ. सायरा नजर आली, डॉ. सय्यद अकिब, औषध निर्माण अधिकारी शुभम पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गौतम खंदारे इम्रान सय्यद स्टाफ नर्स कलावती राठोड कल्पना कुटे, इंदूताईं बांगर यांच्या पथकाने तपासणी केली. जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होऊन वेळेवर निदान झाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. जिल्हा परिषदेत अशा प्रकारचे शिबिर यापुढेही घेतली जावे अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *