धर्माबाद तालुक्यात गांजाची लागवड उघड; १.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
WhatsApp-Image-2026-04-30-at-16.31.23.jpeg


नांदेड (प्रतिनिधी) – धर्माबाद तालुक्यातील एका शेतामध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी धाड टाकून सुमारे ७ किलो १६५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.


धर्माबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपीच्या शेतावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान शेतात गांजाची झाडे लावलेली आढळून आली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून झाडे जप्त केली.
या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेला आरोपी निशांत पंडित कदम (वय ४०, रा. करजेली, ता. धर्माबाद) असा आहे.

 

उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनात धर्माबाद पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.यामध्ये पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर, पोलीस उप निरीक्षक माधव लोणेकर,पोलीस अंमलदार मुंढे,शेख मजहरोद्दीन,विठ्ठल सुपारे,तलवारे,अजीज यांचा समावेश होता.  दरम्यान, जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.


Post Views: 163






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed