कॉर्पोरेट जिहाद – दानिश शेखच्या मोबाइलमध्ये ‘क्राइम डिक्शनरी’:मोबाइल ‘फेस आयडी’ने उलगडणार गुपिते; तरुणींचे फोटो

0
orig_730-x-548-new-2026-04-29t071827389_1777427359.jpg




कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात धक्कादायक मानवी तस्करीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता असून संशयित आरोपी दानिश शेखच्या मोबाइलमुळे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि धर्मांतराच्या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे हाती लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कडेकोट डिजिटल सुरक्षेत असलेल्या या मोबाइलमधून अशा काही करामती बाहेर आल्या आहेत की तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. दानिश शेख याने मोबाइलला सुरक्षेचे अभेद्य कवच चढवले होते. प्रत्येक फाइल आणि ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळे पासवर्ड आणि ‘फेस आयडी’ वापरली होती. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तांत्रिक विश्लेषण करताना या सुरक्षा भिंतीमुळे मोठे अडथळे येत होते. अखेर तपास पथकाने न्यायालयाची विशेष परवानगी मिळवून आरोपी दानिशला प्रत्यक्ष प्रयोगशाळेत नेले आणि त्याच्या ‘फेस आयडी’चा वापर करून मोबाइलचा ताबा मिळवला. प्रेमाच्या नाटकापासून ते परदेशात विक्रीपर्यंतचे रॅकेट सूत्रांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हे केवळ साधे गुन्हेगारी कृत्य नसून ‘जिहाद’ आणि ‘ह्यूमन ट्रॅफिकिंग’चे एक भयानक जाळे आहे. सुरुवातीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींचा विश्वास संपादन करणे, त्यानंतर त्यांचे धर्मांतर घडवून आणणे आणि परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न दाखवणे, अशी याची कार्यपद्धती आहे. एकदा जाळ्यात अडकल्या की या तरुणींना आंतरराष्ट्रीय टोळीमार्फत परदेशात विकले जायचे. मोबाइलमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रुप्स, युवतींच्या फोटोला कोड नंबर मोबाइलमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रुप्स आणि तरुणींचे फोटो आढळून आले असून प्रत्येक तरुणीला एक विशिष्ट कोड नंबर देण्यात आला होता. जणू काही मानवी तस्करीसाठी या तरुणींचे ‘कॅटलॉगिंग’ करण्यात आले असल्याचा दाट संशय आता व्यक्त होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात एका कंपनीपुरती मर्यादित असलेल्या काही कंपन्यांचे धागेदोरे थेट परदेशांपर्यंत पोहोचले आहेत. दानिश शेख हा या साखळीतील एक दुवा असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास आता युद्धपातळीवर सुरू असून त्यातून लवकरच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निदा खानला भेटल्याचा इम्तियाज जलील यांचा दावा मुख्य संशयित आरोपी निदा खान हिची भेट घेतल्याचा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केला. निदा गराेदर असून फरार असल्याचे सांगण्यात येत अाहे. तिच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल असून तिसरी सुनावणी २ मे राेजी आहे. त्याच वेळी इम्तियाज यांनी हे संपूर्ण प्रकरण बनावट असून आपण निदा खानच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सोशल मीडियावरील व्हिडिओतून म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed