CM Fadnavis Reverses Shinde Govts 11 Lake Project Decision; Environment Dept Order

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-28t16_1777374632.png


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. सरकारने शिंदेंच्या काळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करून या कामांसाठी आतापर्यंत वितरित केलेला 91

.

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाने 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. या प्रकल्पांत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना व त्यांच्याकडे यासंबंधित खाते असताना मंजुरी दिलेल्या 11 प्रकल्पांचा समावेश आहे. उर्वरित 3 प्रकल्प हे आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असतानाचे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहेत. आता पर्यावरण खात्याने या प्रकल्पांसाठी वितरित करण्यात आलेल्या निधीची व्याजासकट वसुली करण्याचे आदेश दिलेत. एका मराठी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. फेब्रवारी 2026 मध्ये झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

वित्तीय अनियमिततेवर ठेवले बोट

पर्यावरण खात्याने या प्रकल्पांची मान्यता रद्द करण्यासाठी काही प्रकल्पांचे प्रस्ताव विहित नमुन्यात नसल्याचे व काहींचे सुधारित आराखडे 2 वर्षे लोटल्यानंतरही सादर न झाल्याचे तांत्रिक कारण दिले आहे. राज्यात 2006-07 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राज्य तलाव संवर्धन योजना राबवण्यात येते. पण तांत्रिक त्रुटी व अंमलबजावणी यातील दिरंगाई यामुळे वित्तीय अनियमितता टाळण्यासाठी ही कठोर पाऊले उचलण्यात आल्याची पुस्तीही विभागाने या प्रकरणी जोडली आहे.

वितरित करण्यात आलेला निधी व्याजासकट परत करण्याचे निर्देश

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मंजूर केलेल्या 11 प्रकल्पांची एकूण किंमत 244.15 कोटी रुपये एवढी होती. यात लातूरच्या मुक्तेश्वर व औसा तलाव, रायगडमधील कर्जतचा वडाप तलाव, बीडच्या परळी येथील परंपोक तलाव, अलिबागचा बेलोशी तलाव व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील कळमाडू व विसापूर तलावाचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी आतापर्यंत 73.31 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या काळातील रत्नागिरी, मुंबई (एरंगल) व नाशिक येथील प्रकल्पांना 18 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आता हा निधी व्याजासकट परत करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

हे ही वाचा…

फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान:पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक व असंवदेनशील कृत्य आहे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed