मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकरी आत्महत्या:सरकारला अजून किती बळी हवेत? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-28t16_1777372265.png




काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यात अवघ्या 3 महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या सरकारला आणखी किती बळी हवेत, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या संकटांच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींसह मानसिक तणावाचाही मोठा डोंगर उभा राहतो. आणि त्यातून अनेकदा आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले जातात. शासनाकडून कर्जमाफी, मदतपॅकेज व विविध योजनांची घोषणा होते. पण प्रत्यक्षात त्याचा लाभ वेळेत व प्रभावीपणे पोहोचत नसल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर उपरोक्त टीका केली आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यात सरकार अपयशी विजय वडेट्टीवार सोशल मीडियातील आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, मराठवाड्यात अवघ्या तीन महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय. कर्जाचा बोजा आणि उद्ध्वस्त झालेल्या पिकांमुळे बळीराजा हतबल झाला आहे. रक्ताचं पाणी करून जगाला पोसणारा अन्नदाता आज स्वतःच्याच शेतात फासावर लटकतोय, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. सरकारला अजून किती बळी हवेत? तुमच्या मदतीच्या घोषणा आणि योजना फक्त कागदावरच नाचत आहेत, पण शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहचायला यांना मुहूर्त मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात हे सरकार पूर्णपणे निकामी ठरलं आहे. अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे ते म्हणालेत. राहुल गांधींवरील टीका धुडकावली उल्लेखनीय बाब म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी भाजप नेते विनोद तावडे यांनी राहुल गांधींवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली होती. ज्यांना परकीय सत्तांसमोर लोटांगण घालण्याचा वारसा लाभला आहे, ते कोणत्या तोंडाने बोलतात? असा प्रश्न तावडेंनी राहुल गांधींच्या संघावरील टीकेला प्रत्युत्तर देताना उपस्थित केला होता. त्यावर वडेट्टीवार म्हणाले होते, स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचा कुठेही सहभाग नव्हता, ज्यांची विचारसरणीच परकीय सत्तेसमोर नतमस्तक होण्यात वाढली, त्यांनी काँग्रेस आणि देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे इतिहासाचाच अपमान आहे. देशासाठी तुरुंगवास भोगणाऱ्यांना, बलिदान देणाऱ्यांना आणि भारताच्या लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्यांना आज उपदेश देण्याचा नैतिक अधिकार विनोदजी तुमच्या भाजप-आरएसएसकडे नाही. देशभक्ती ही तुमच्या प्रमाणपत्रावर चालत नाही आणि काँग्रेसचा 140 वर्षांचा त्याग, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचा इतिहास तुमच्या खोट्या प्रचाराने पुसला जाणार नाही. सत्तेसाठी देशाची प्रतिष्ठा गहाण ठेवणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा, मग इतरांना राष्ट्रभक्ती शिकवावी, असे ते म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed