बिडकीन DMIC मध्ये 2 तरुणांचे मृतदेह सापडले:बॉडीजवळ इंडोसल्फान विषारी औषधाचा डबा आणि इंग्लीश दारूच्या बाटल्या, पोलिसांचा तपास सुरू
![]()
बिडकीन DMIC मध्ये 2 तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार 28 एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. या मृतदेहांजवळ इंडोसल्फान या विषारी औषधाचा डबा आणि इंग्लीश दारूच्या बाटल्या सापडल्यात. गणेश झिरपे, भगीरथ आरगडे अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, ही आत्महत्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिडकीन DMIC परिसरात मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्ल्या नागरिकांना दोन तरुणांचे मृतदेह दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती कळवली. या मृतदेहांजवळ MH20 FX6845 ही हिरो कंपनीची दुचाकी उभी होती. सोबतच इंडोसल्फान या विषारी औषधाचा डब्बा, इंग्लिश दारूची बाटली, पाण्याची बाटली व दोन ग्लास आढळून आले. या ठिकाणी दोन मोबाइलही सापडले. दोघांची ओळख पटली असून एकाचे नाव गणेश झिरपे असून तो बिडकीन येथे श्री कॉलनीमध्ये राहतो. दुसऱ्याचे नाव सचिन भगीरथ आरगडे असूनह हा धनगर पिंपरी (जि. जालना) येथील रहिवासी आहे. सहाय्यक फौजदार अशोक सोकटकर, संजीवन कदम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलेत.
