पेडगाव शिवारात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ:हातातील कड्यावरून ओळख पटविण्याचे बासंबा पोलिसांचे प्रयत्न

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-27t17_1777290440.png




हिंगोली तालुक्यातील पेडगाव शिवारात लहान्या पुलाखाली मानवी सांगाडा सोमवारी ता. २७ सापडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सांगाड्याच्या हातामध्ये असलेल्या कड्यावरून आता त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न बासंबा पोलिसांनी सुरु केला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरमस ते पेडगाव शिवारात माळरानाचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या एका लहान्या पुला खाली मानवी सांगाडा असल्याचे एका शेतकऱ्याला आज सकाळी दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती तातडीने बासंबा पोलिस ठाण्यास देण्यात आली. बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार शिवप्रसाद पोले यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी केवळ एक सांगाडा आढळून आला. सांगाड्याच्या उजव्या हातात कडे असून शरीराचा संपूर्ण भागच वाळून गेला आहे. अधिक तपासणी मध्ये सदर सांगाडा पुरुष जातीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सदर व्यक्ती कधी मरण पावला तसेच त्यांचा खून कि आत्महत्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर पोलिसांनी आता सांगाड्याच्या हातातील कड्यावरून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या शिवाय हिंगोली तालुका, विदर्भातील पुसद तालुक्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी विदर्भातील यवतमाळ जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्यांना या घटनेची माहिती कळविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे त्या परिसरात दुर्गंधी सुटली नाही. त्यामुळे सदर मयत व्यक्तीबाबत तातडीने माहिती मिळाली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed