विभागात तीन महिन्यांत 217 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:संभाजीनगर जिल्ह्यात 53 घटना, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम
![]()
दुष्काळी प्रदेश अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या ३ महिन्यांत तब्बल २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. विभागीय आयुक्तालयाच्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली असून, यात सर्वाधिक ५३ शेतकरी आत्महत्या एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाल्या आहेत. गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी, नद्यांनी खरडून नेलेली सुपीक जमीन, पिकांवरील कीड आणि हाती आलेल्या शेतमालाला न मिळालेला योग्य भाव यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच मुलींची लग्ने आणि आजारपणात उपचाराचा खर्च भागवताना शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. याच विवंचनेतून अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. महसूल विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च २०२६ या काळात झालेल्या २१७ आत्महत्यांपैकी केवळ ४७ प्रकरणे शासनाच्या १ लाख रुपये मदतीसाठी पात्र ठरली आहेत. या पात्र प्रकरणांतील वारसांना ४४ लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. ९ प्रकरणे अपात्र ठरली असून, तब्बल १६१ प्रकरणे अद्यापही चौकशीच्या फेऱ्यात प्रलंबित आहेत. गेल्यावर्षी मार्च २०२५ अखेर विभागात १,१२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी ७९६ प्रकरणे मदतीसाठी पात्र, १४० अपात्र ठरली होती, तर १९३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्या
जिल्हाआत्महत्या
संभाजीनगर५३
बीड४९
धाराशिव३०
नांदेड२९
जिल्हाआत्महत्या
परभणी१९
जालना१३
हिंगोली१३
लातूर११ गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी, नद्यांनी खरडून नेलेली सुपीक जमीन, पिकांवरील कीड आणि हाती आलेल्या शेतमालाला न मिळालेला योग्य भाव यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच मुलींची लग्ने आणि आजारपणात उपचाराचा खर्च भागवताना शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. याच विवंचनेतून अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. महसूल विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च २०२६ या काळात झालेल्या २१७ आत्महत्यांपैकी केवळ ४७ प्रकरणे शासनाच्या १ लाख रुपये मदतीसाठी पात्र ठरली आहेत. या पात्र प्रकरणांतील वारसांना ४४ लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. ९ प्रकरणे अपात्र ठरली असून, तब्बल १६१ प्रकरणे अद्यापही चौकशीच्या फेऱ्यात प्रलंबित आहेत. गेल्यावर्षी मार्च २०२५ अखेर विभागात १,१२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी ७९६ प्रकरणे मदतीसाठी पात्र, १४० अपात्र ठरली होती, तर १९३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. छ. संभाजीनगर जिल्ह्यात नोव्हेंबरपर्यंत झालेला पाऊस अन पुरामुळे दावणीची जनावरे डोळ्यादेखत वाहून गेली. यावर्षी पहिल्या ३ महिन्यांत जिल्ह्यात ५३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. त्यापैकी केवळ १० शेतकरी मदतीस पात्र ठरले असून, त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत मिळाली आहे, तर ४२ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. मराठवाड्यात जानेवारी महिन्यात ७६, फेब्रुवारीत ५९, तर मार्च महिन्यात सर्वाधिक ८५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली.
