वेरूळला जगद्गुरू जनशांती धर्म‎सोहळ्यात 42 क्विंटल महाप्रसाद‎:108 कुंडी यज्ञासाठी हजारो भाविकांची उपस्थिती

0
transfar_transfar_transfar_240_177711566969eca2153b5ba_verul1111.jpg




वेरूळ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे शनिवार (२५ एप्रिल) रोजी अक्षय्य तृतीयेच्या पावन मुहूर्तावर १८ एप्रिलपासून सुरू असलेल्या ‘ॐ जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्या’ची शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी भाविकांसाठी ४२ क्विंटल महाप्रसाद तयार करण्यात आला होता. ब्रह्मलीन जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आठदिवसीय आध्यात्मिक सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या १०८ कुंडी यज्ञाची पूर्णाहुती जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज व अनेक मान्यवर साधुसंतांच्या हस्ते झाली. यज्ञवेदीतून निघणाऱ्या मंत्रघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अनुष्ठानासाठी बसलेल्या हजारो भाविकांनी गेल्या आठ दिवसांचे मौनव्रत परमपूज्य बाबाजींच्या उपस्थितीत सोडले. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या आठ दिवसांत हजारो भाविकांनी त्यांना असलेले विविध प्रकारचे व्यसन बाबाजींच्या चरणी अर्पण करून व्यसनमुक्तीचा संकल्प केला. श्रमदान, गोसेवा, विशेषतः सेंद्रिय शेती व स्वदेशी उत्पादने दैनंदिन जीवनात वापरावीत यावर जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांनी सांगता प्रवचनात विशेष भाष्य केले.यावेळी भाविकांची उपस्थिती होती. वेरुळ येथे जगदगुरू जनशांती धर्म सोहळ्याची सांगता जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाली. साधू-संतांसह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम आठ दिवस चाललेल्या या सोहळ्याला अनेक पूजनीय साधू-संत, विविध क्षेत्रातील मान्यवर व राजकीय पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. समारोपप्रसंगी वेरूळ येथील नाथाश्रमाच्या अक्काताई महाराज, जनेश्वरानंद महाराज, विवेकानंद महाराज, नागेश्वरानंद महाराज यांच्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्व प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने भक्त परिवार उपस्थित होता. सोहळा यशस्वी करण्यासाठी विवेकानंद महाराज, नागेश्वरानंद महाराज व जिल्ह्यातील सर्व भक्त परिवाराने विशेष परिश्रम घेतल्याची माहिती जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार यांनी दिली. सांगता समारंभास आलेल्या हजारो भाविकांसाठी २१ क्विंटल साखरेची बुंदी व २१ क्विंटल मसाले भात अशा एकूण ४२ क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भाविकांनी शिस्तबद्धपणे महाप्रसादाचा लाभ घेतला. आठदिवसीय आध्यात्मिक सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. अनुष्ठानासाठी बसलेल्या हजारो भाविकांनी गेल्या आठ दिवसांचे मौनव्रत परमपूज्य बाबाजींच्या उपस्थितीत सोडले. मागील आठ दिवसांपासून याठिकाणी धार्मिक कार्यक्रम, तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed