नाशिकला श्रमिकांच्या कल्याणापेक्षा संस्थांवर नेत्यांची मक्तेदारी:ठेक्यांसाठी काेट्यधीश नेते बनले बांधकाम मजूर; नियम धाब्यावर
![]()
अंगमेहनतीचे काम करणाऱ्या मजुरांच्या हक्कासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या मजूर संस्थांवर खऱ्या मजुरांऐवजी राजकीय नेत्यांनीच कब्जा केला आहे. मजुरीवर उदरनिर्वाह, अल्पभूधारक आणि आयकर न भरणारा हे मजूर संस्थांसाठीचे सहकार आयुक्तांचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात, अनेक राजकीय पदे भोगणारे, आलिशान बंगले असणारे आणि निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये कोट्यवधींची संपत्ती जाहीर करणारे मातब्बर नेते ठेक्यांसाठी ‘मजूर’ बनल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पडताळणीत पुढे आले. मजुरांच्या सहकारी संस्थांना ५० लाखांपर्यंतची सरकारी कामे देण्याचा नियम आहे. आतापर्यंत याचा गैरवापर करत अनेक राजकीय नेत्यांनी सरकारी कामे पदरी पाडून घेतली. त्यासाठी मजूर संस्थांचे नियम तोडून स्वत:च मजूर असल्याचे दाखवत संस्था उभ्या केल्या. याबाबत त्यांना मजूर असल्याचे प्रमाणपत्र कसे मिळाले, या ‘दिव्य मराठी’च्या प्रश्नावर सहकार निबंधकांनी लेबर ऑफिसर आणि महसूल विभागाकडे बोट दाखवले, तर या विभागाने ही माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आता पुढे काय चौकशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. थेट प्रश्न फय्याज मुलानी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था माहिती नाही, पडताळणी करतो नेते ९० दिवस शारीरिक श्रम कसे करू शकतात?
याबाबत मला माहिती घ्यावी लागेल. मी त्वरित पडताळणीचे आदेश देतो.
नेत्यांची मजुरीची बोगस घोषणापत्रे कशी स्वीकारली
मजुरीचे प्रमाणपत्र लेबर ऑफिसर किंवा महसूल विभागाकडून देण्यात येते. विचारण्याचा अधिकार कोणी दिला : सकाळे तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्ही मला कशासाठी फोन केला? पोलिसांना सांगून तुमचा कायद्याचा बालेकिल्ला करू का? – संपत सकाळे
संस्थेचे नाव : देवता मजूर सहकारी संस्था लि.
नेत्याचे नाव : संपत सकाळे (राष्ट्रवादी)
ठिकाण : पिंपळद (त्र्यंबकेश्वर)
राजकीय पदे : माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष.
आमच्या पाहुण्यांची संस्था :खोसकर ही संस्था आमच्या पाहुण्यांची आहे, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. पाहुण्यांना सरकारी कामे मिळतात. – वामन खोसकर, आमदारपुत्र संस्थेचे नाव : अष्टविनायक मजूर व बांधकाम सह. सोसा.
नेत्याचे नाव : वामनखोसकर (राष्ट्रवादी)
ठिकाण : साप्ते (त्र्यंबकेश्वर)
राजकीय पदे : आमदार हिरामणखोसकर यांचे सुपुत्र. हिरेंचा नाशिकमधील फ्लॅट आमच्या वडिलांनी ही संस्था काढली. मजूर कोणीही असू शकते. अनेक राजकीय नेत्यांनी काढल्या आहेत. – योगेश हिरे संस्थेचे नाव : नाशिक बांध. मजूर सह. संस्था
नेत्याचे नाव : योगेश हिरे (भाजप)
ठिकाण : नाशिक
राजकीय पदे : माजी नगरसेवक, भाजप आमदार सीमा हिरे यांचे दीर
घोषित संपत्ती : ३ कोटी १६ लाख पवारांचे येवल्यातील घर मजूर म्हणून काम केलेले नाही. मी आता एका कार्यक्रमात आहे. नंतर फोन करून या विषयावर बोलतो. – संभाजी पवार संस्थेचे नाव : कल्याणी मजूर व बांध.सह. सो.
नेत्याचे नाव : संभाजी पवार (राष्ट्रवादी)
ठिकाण : सावरगाव, येवला
राजकीय पदे : माजी पंचायत समिती सभापती, येवला बाजार समिती सभापती
घोषित संपत्ती : १ कोटी ४९ लाख. आहेरांचा देवळ्यातील बंगला मी मजूर म्हणून काम केले नाही. मी फेडरेशनचा अध्यक्ष होतो. आता मी बाहेर पडलो आहे. – केदा आहेर संस्थेचे नाव : सप्तश्रृंगी मजूर सोसायटी
नेत्याचे नाव : केदा आहेर (माजी भाजप नेते)
ठिकाण : देवळा राजकीय पदे : माजी जि. प. सभापती, नाफेड संचालक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष, माजी मंत्र्यांचा पुतण्या
घोषित संपत्ती : २९ कोटी रुपये. सभासद मजुराची पात्रता… घोषणापत्र आवश्यक 1. सभासद शारीरिक श्रम करणारा असावा.
2. तो अल्प किंवा अत्यल्पभूधारक असावा.
3. उदरनिर्वाह शारीरिक श्रमांवरच अवलंबून असावा.
4. मी मजूर असल्याबाबतचे घोषणापत्र द्यावे.
5. मजूर म्हणून कामाचा ९० दिवसांचा पुरावा द्यावा.
