1-59_1777138563.jpg


शिक्षण ही माणसाच्या उत्क्रांतीची एक अखंड, अविरत व परिवर्तनशील प्रक्रिया आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते आणि ज्ञानाच्या व्याख्याही बदलतात. आज AI मुळे ज्ञानाच्या कक्षा अभूतपूर्व वेगाने रुंदावत आहेत. समाजात घडणाऱ्या शिक्षणक्रांतीमुळे समाजमन घडले, विचार

.

प्राथमिकपूर्व शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंतची ज्ञानाची कवाडे उघडण्यासाठी अनेकांच्या पायांची बोटे ठेचली गेली. भारतात बालवाडी, अंगणवाडी व बालकेंद्रित शिक्षणाची संकल्पना रुजवणाऱ्या ताराबाई मोडक यांचेही कार्य याच संघर्षमय परंपरेतील एक तेजस्वी पर्व आहे. ‘धुरंधर’मध्ये आज आपण याच शिक्षणतपस्विनीचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत.

ताराबाई मोडक ह्या शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक होत्या. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1892 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव केळकर, तर आईचे नाव उमाबाई होते. त्या 1914 साली बीए झाल्या. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांची ओळख अमरावतीच्या कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी झाली. पुढे त्यांनी नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह केला. कृष्णा मोडक वकील होते. त्यांना प्रभा नामक एक मुलगी होती. पुढे कृष्णा व्यसनाधीन झाले. त्यामुळे या दाम्पत्याने आपल्या वाटा वेगळ्या केल्या. त्यानंतर ताराबाईंनी अमरावती सोडली.

महाराष्ट्र सोडून गुजरातेत स्थलांतर

ताराबाईंनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यांची गुजरातच्या राजकोट येथे सरकारी मुलींच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्यपदी नियुक्ती झाली. त्यांच्या रुपाने एखाद्या भारतीय महिलेला पहिल्यांदाच या महाविद्यालयात असा मान मिळाला होता. तिथे त्यांनी 1921-23 अशी 2 वर्षे प्राचार्य म्हणून नोकरी केली. या कालावधीत त्यांनी गुजराती भाषा आत्मसात केली. यावेळी त्यांचे लक्ष गिजुभाई बधेका यांच्या बालशिक्षणाच्या प्रयोगांकडे वेधले गेले. त्या बधेका यांचे भावनगरचे बालमंदिर व त्यांचे प्रयत्न पाहून फारच प्रभावित झाला. त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण जीवन बालशिक्षणाला वाहून घेण्याचा निर्धार केला. त्यानुसार, राजकोट येथील चांगला पगार, गाडी, बंगला, मानसन्मान आदींचा त्याग करून त्यांनी गिजुभाईंच्या प्रयोगात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

ताराबाई व गिजुभाई यांनी 1923 ते 1932 या 9 वर्षांत संयुक्तपणे बाल शिक्षण क्षेत्रात संशोधनपूरक काम केले. या माध्यमातून त्यांनी भारतात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया घातला. या दोघांना अडीच ते 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांसाठी बालशाळा असण्याची गरज वाटली. त्यासाठी त्यांनी त्याच्या कार्यपद्धतीचा शोध सुरू केला. ती कार्यपद्धत स्वदेशातील आर्थिक, सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक परिस्थितीशी मिळतीजुळती असण्यास हवी असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी मुलांसाठी गोष्टी, गाणी, बडबड गीते, अभिनय गीते, लोकगीते असे विविध प्रकारचे साहित्य लिहून ते प्रकाशित केले. तो बालसाहित्याचा प्रमाणित नमुनाच ठरला.

आज अंगणवाडी ही शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानली जाते. या अभिनव संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. त्यांनी 1936 साली नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. त्यानंतर 1948 पर्यंत त्यांनी मुंबईतील दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नामक संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या माँटेसरी पद्धतीचा अवलंब करून त्यांनी हे बालशिक्षण ग्रामीण व आदिवासी भागांत पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती. त्यामुळे त्यांनी शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी कुरणशाळा सारखे यशस्वी प्रयोग राबवले.

ताराबाईंनी शिक्षण पत्रिका हे मासिक सुरू केले. त्याद्वारे समाजाचे बाल संगोपनाविषयी प्रबोधन केले. या प्रकरणी प्रदर्शने, पालक मेळावे, सभा, परिषदा, संमेलने आयोजित करून समाजात बालशिक्षणाविषयी कुतूहल निर्माण केले.

दक्षिणामूर्तीतील ‘गिता’ पद्धत

ताराबाई व गिजुभाई यांच्या मनात माँटेसरी पद्धतीविषयी भक्तिभाव होता. पण त्यानंतरही प्रत्यक्ष प्रयोग करताना मात्र गिजुभाई व ताराबाई यांनी आपल्या देशातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय परिस्थितीचा साकल्याने विचार करून त्यात ते योग्य ते फेरफार केले. त्यानंतर ती पद्धती त्यांनी भारतात अंमलात आणली. या दोघांनी मिळून प्रचारात आणलेल्या या पद्धतीला दक्षिणामूर्तीत ‘गिता’ पद्धत म्हणत असत. कारण गिजुभाई आपल्या लेखाच्या खाली ‘गि’ माणून सही करत, तर ताराबाई ‘ता’ अशी सही करीत.

गिजुभाई म्हणजे काकासाहेब कालेलकरांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘बालसाहित्याचा ब्रह्मा’. ताराबाईंनी आपल्या आयुष्यातील 9 वर्षे त्यांच्या सहवासात दक्षिणामूर्तीत घालवली. त्या याविषयी सांगतात, मी विलायतेत गेले असते, तर तिकडून एखादी पदवी घेऊन आले असते. जमेल तेवढे शिक्षणकार्य मी कुवतीनुसार केले असतेच. पण गिजूभाईंचे जीवन पाहून मी जे ज्ञान मिळविले, ते मला इतर कुठेही खरेदी करता आले नसते.

महात्मा गांधींची पाचगणीत घेतली भेट

ताराबाई 1936 साली महाराष्ट्रात परतल्या. त्यांनी मुंबईतील दादर येथे आपल्या कार्यास सुरुवात केली. त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहारची स्थापना केली. या संस्थेची मराठी व गुजराती या दोन्ही भाषांत बालमंदिर होते. तत्कालीन समाज हा गरिबीने पिंजलेला होता. त्यामुळे हे महागडे बालशिक्षण आमच्या गरीब देशाला परवडणार आहे का? भारत मुख्यतः खेड्यांचा देश आहे, तिथपर्यंत हे शिक्षण कसे पोहोचवणार? गावखेड्यातील लोकांना ते पेलवेल का? तुम्हाला खेड्यांत अशा बालशाळा चालवून त्या यशस्वी करून दाखवता येतील का? असे विविध प्रश्न ताराबाईंना भंडावून सोडत होते. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा खेड्यांकडे वळवला. त्यांनी पाचगणी येथे महात्मा गांधी यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे बालशिक्षणाविषयीचे कार्य व आपले विचार मांडले. गांधींनी त्यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.

महात्मा गांधी म्हणाले, ताराबाई, तुमच्या बालशिक्षणाला माँटेसरी पद्धती व त्यांची साधने आहेत. ती साधने फार महाग असतात. तुम्ही बालशिक्षणाचे कार्य करत आहात, तेव्हा त्यासाठी भारतीय पार्श्वभूमी तयार करा. भारतातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक परिस्थितीशी मिळतीजुळती अशी बैठक तयार करा. शैक्षणिक साधने स्वस्त व स्थानिक कारागिरांना तयार करता येतील, शिक्षकांचा त्यात जास्तीत जास्त सहभाग असेल असे पाहा. थोडक्यात काय तर इटलीतील मॅडम माँटेसरीची तत्त्वे स्वीकारा, पण त्याला भारतीय स्वरुप द्या. भारतासाठी भारताची बालशिक्षण पद्धत स्थापन करा. तुमचे हे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी ठरेल. स्वतंत्र भारतातील भावी पिढ्यांमध्ये सुसंस्कृत व आदर्श नागरीक तयार करण्याचे पायाभूत शिक्षण म्हणून ही बालशिक्षण पद्धत योग्य ठरेल, असे गांधी म्हणाले.

…अन् ताराबाईंनी खेड्यांकडे वळवला मोर्चा

महात्मा गांधींच्या आशीर्वादाने ताराबाईंच्या उत्साहाला उधाण आले. त्यांनी आपले लक्ष खेड्यांकडे वळवले. त्यांनी त्यांचे सहकारी शेष नामले व सरला देवधर यांच्यावर शिशुविहार शिक्षण केंद्राची जबाबदारी सोपवली. त्यांनी अनुताई वाघ या आपल्या कार्यकर्तीला सोबत घेऊन ठाणे (आताचा पालघर जिल्हा) जिल्ह्यातील बोर्डी या गावी बस्तान बसवले. तिथ 24 डिसेंबर 1945 रोजी त्यांनी नूतन बालशिक्षण संघाच्या ग्राम बाल शिक्षा केंद्र या नव्या संस्थेची स्थापना केली. या केंद्राच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे आले होते. ताराबाईंनी 1945 ते 1956 या एका तपाच्या काळात बालशिक्षणाविषयी विविध प्रयोग केले. त्यांनी बोर्डीत अध्यापन मंदिराची स्थापना केली.

बालवाडी अन् अंगणवाडी शब्द कसा तयार झाला?

ताराबाईंनी बालमंदिराच्या शिक्षकांसाठी अभ्यासक्रम तयार केला. बोर्डी येथील अध्यापन मंदिर हे बहुभाषीय व बहुप्रांतीय अध्यापन मंदिर होते. गुजरात, केरळ, बंगाल, पंजाब, मध्य प्रदेश, काश्मीर या प्रांतातून शिक्षण या अध्यापन मंदिरात प्रशिक्षणासाठी येत होते. ताराबाईंनी स्वतः प्रशिक्षण घेऊन नूतन बाल शिक्षण पद्धती प्रस्थापित केली. त्यातून ग्रामीण बालशिक्षणाची मजबूत बैठक तयार झाली. बालवाडी, अंगणवाडी या शब्दांची उत्पत्ती बोर्डीतच झाली.

गुजरातचे शिक्षणतज्ज्ञ जुगतरामभाई दवे हे बोर्डीला ताराबाईंचे काम पाहण्यासाठी नेहमीच येत असत. ते एकदा ताराबाईंना म्हणआले, बोर्डीला चिकूच्या वाड्या आहेत. तुमच्या या बालमंदिराला जर बालवाडी म्हटले तर कसे वाटेल? ताराबाईंना तो शब्द आवडला. त्यांनी बालमंदिराचे नाव बालवाडी असे केले. लहान मुलांची शाळा सुरुवातीच्या काळात आदिवासी घराच्या अंगणात भरत असे. त्यालाही अंगणवाडी असे नाव पडले.

इटलीच्या दौऱ्यावर जाऊन मांडले शिक्षण कार्य

22 ऑगस्ट से 29 ऑगस्ट 1949 या कालावधीत माँटेसरीच्या मायभूमीत म्हणजे इटलीच्या सॅन रॅमो नामक शहरात 8 वे आंतरराष्ट्रीय माँटेसरी संमेलन भरले होते. जनताजनार्दनाने दिलेल्या भरपूर व उत्स्फूर्त आर्थिक देणगीमुळे 15 ऑगस्ट 1949 रोजी रात्री 11 च्या विमानाने ताराबाई युरोपला जाऊ शकल्या. या संमेलनासाठी तब्बल 20 देशांतील 500 प्रतिनिधी आले होते. त्यापैकी 6 भारतीय प्रतिनिधींत ताराबाई होत्या. या परिषदेत ताराबाईंनी हिंदुस्थानात चाललेले नूतन बालशिक्षण संघाचे कार्य हा निबंध वाचला. या संमेलनाचा सविस्तर वृतांत व इतर 9 देशातील पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा इतर शिक्षणसंस्थाचे तपशीलवार वर्णन ताराबाईंनी शिक्षणपत्रिकेतील लेखन स्वरूपाने वाचकांना कळवले.

1948 मध्ये मुंबईत झालेल्या बालशिक्षण शिबिराच्या धर्तीवर ग्रामीण परिस्थितीला अनुसरून 7 दिवसांचे बालशिक्षण शिबिर मे 1950 मध्ये डहाणू व उंबरगाव तालुक्यातील जनतेच्या वतीने बोर्डीस ग्रा. बा. शि. केंद्राने भरवले. यामुळे या तालुक्यांत बालशिक्षणाच्या प्रचारात चांगली मदत झाली.

कुरणशाळा, एक क्रांतिकारी पाऊल

मोठ्या वयाच्या आदिवासी मुलांना वर्षातील काही महिने गुरे चारणे अनिवार्य होते. अशा मुलांच्या शिक्षणाची वेगळी व्यवस्था करण्यासाठी ताराबाईंनी कुरणशाळेचा अभिनव प्रयोग 1958 मध्ये सुरू केला. या प्रयोगाची शिक्षणक्षेत्रातील एक खास व मौलिक शोध म्हणून कायमची नोंद झाली आहे. मुले शाळेत येत नसतील तर शाळेने मुलांकडे जावे, हा या प्रयोगात पवित्रा घेतला गेला.

कुरणशाळा म्हणजे निसर्गाच्या मांडीवर खेळणाऱ्या निसर्गबाळांसाठी काढलेली निसर्गशाळा होती. त्यासाठी हिरव्या रानाची पाटी बनवली. कुरणशाळेचा प्रयोग विकासवाडी प्रयत्नात स्थान मिळवून बसला. 1974 साली भारत सरकारने कुरणशाळा व Meadow School ही या प्रयोगाचा आढावा घेणारी पुस्तिका ताराबाईंकडून लिहून घेतली व प्रकाशित केली. या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत श्रीमती सुलभा पाणंदीकर यांनी ताराबाई व त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेला नव्या शाळेचा हा प्रकार म्हणजे जीवन शिक्षणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे असे मत व्यक्त केले.

ताराबाई आणि बालशिक्षण या स. आ. केळकर लिखित पुस्तकाच्या प्रस्तावनेत काका कालेलकर म्हणतात, मी जर हिंदुस्तानचा शिक्षणाकार्याचा इतिहास लिहावयास बसलो तर एका ‘नव्या युगाचा आरंभ’ म्हणून ताराबाईंच्या कुरणशाळेतला एक स्वतंत्र अध्याय घेईन. विद्यार्थ्यापर्यंत शाळेनेच पोहोचण्याचे हे सूत्र खरोखरच क्रांतिकारी आहे, युगांतरकारी आहे. पण याचा प्रत्यक्ष प्रयोग करून पाहण्याची हिंमत ताराबाईनी केली.

विकासवाडी अध्यापन मंदिर

जून 1957 पासून विकासवाडी अध्यापन मंदिर कोसबाड येथे सुरू करण्यात आले. आदिवासी भागातील प्राथमिक शाळांत ज्या शैक्षणिक सुधारणा व्हावयास हव्यात, त्या पासून आणण्यासाठी शिक्षक तयार करावेत अशी मूळ कल्पना होती. 1958 पासून ग्रामसेविका विद्यालय ताराबाईंच्या देखरेखीखाली केंद्रीय समाजकल्याण बोर्डाने सुरू केले. ताराबाई मोडक यांच्या चरित्रकार पद्मा फाटक म्हणतात, बालशिक्षणाचा जो विराट प्रयोग आपल्या आयुष्यातील 50 हून अधिक वर्षे ताराबाईंनी केला, त्या प्रयोगाची सांगता म्हणजे त्यांची ही कोसबाडच्या जंगलातल्या टेकडीवरची विराणी, वर्धिष्णू संस्था-विकासवाडी होय.

मोलमजुरी करणाऱ्यांसाठी रात्रशाळा

ताराबाईंनी दिवसभर मोलमजुरी करणाऱ्या मुलांसाठी रात्रशाळा निर्माण केली. कमवा व शिकवा या सूत्राचा आधार घेऊन अर्थार्जनाचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योगालय सुरू केले आणि हे उद्योग तेथील भौगोलिक परिस्थितीशी पूरक असे होते. पळसाची पाने गोळा करणे, गवतपासून औषधाच्या बाटल्यांना आवरण तयार करणे, सुतारकाम, विणकाम, छत्र्या बनवणे, खेळणी, खडू, व उदबत्या तयार करणे आदींच्या माध्यमातून ताराबाईनी शिक्षण जीवनाभिमुख व व्यवसायाभिमुख बनवले. मुलांना बोन्साय करू नका. त्यांना वटवृक्षासारखे वाढू द्या, असे ताराबाई नेहमी म्हणत.

यशवंतरावांनी 1 लाख रुपयांची थैली दिली

शासनाने 1962 साली ताराबाईंचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवशी 1 लाख रुपयांची थैली महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने त्यांना अर्पण केली. त्यांचा जाहीर सत्कार केला. सरारने त्यांच्या कुरणशाळाच्या अनोख्या प्रयोगाचे पुस्तक प्रकाशित करून त्यांच्या कार्याला देशभर प्रसिद्धी दिली. स.ह. देशपांडे यांनी त्यांच्या कार्यावर एक संशोधनात्मक निबंध लिहिला. हा निबंध अमेरिकेतील इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय संघटनेने 1979 साली पुस्तक रुपाने प्रकाशित केला.

शिक्षण शास्त्रज्ञ चित्रा नाईक यांनी 1978 साली युनिसेफसाठी ग्रोइंग अॅड कोसबाड हिल नामक पुस्तक लिहिले. यामुळे ताराबाईंचे शैक्षणिक कार्य जगभरात पसरले. ताराबाईंच्या कोसबाड येथील शिक्षणकार्याला भारतीय व जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. त्यांचे 1973 साली निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा त्यांच्या बोर्डीपासूनच्या सहकारी व शिष्या अनुताई वाघ यांच्या खांद्यावर आली. त्यांनी ताराबाईंचे कार्य जोमाने पुढे नेले.

धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा…

धुरंधर; विल्हेल्म वुंड्ट:मानवी ‘मन’ नामक गूढ अन् अदृश्य गोष्टीला प्रयोगशाळेत उभे करून त्याचा वैज्ञानिक अभ्यास करणारा शास्त्रज्ञ

धुरंधर; डॉ. जोनास सॉल्क:पोलिओमुळे लुळ्या पांगळ्या झालेल्या मानवजातीला पुन्हा 2 पायांवर ठामपणे उभा करणारा महान संशोधक

धुरंधर-70; भाऊ महाजन:अंधश्रद्धेने पछाडलेल्या समाजाला पाश्चात्य शिक्षण अन् नव विचारांचे औषध देऊन विवेक जागवणारा पत्रकार

धुरंधर-69; नरेंद्र दाभोलकर:देवाच्या नावावर भीती विकली जाते अन् चमत्कारांच्या नावाने उघड फसवणूक होते तेव्हा दाभोलकर हवे असतात

धुरंधर-68; सुखदेव थापर:भगत सिंग अन् राजगुरू सोबत हसत फासावर जाणाऱ्या क्रांतिकारी शहीद सुखदेव यांची प्रेरणादायी गोष्ट

धुरंधर-67; गोपाळबाबा वलंगकर:विटाळलेले भांडे जाळले की शुद्ध होते, मग माणूस विटाळला तर त्यालाही भाजायचे का? असा सवाल करणारा दलितांचा आधारवड

धुरंधर-66; मुक्ता साळवे:वेद आपले ‘धर्मपुस्तक’ नाही असे ठणकावून सांगणाऱ्या गावकुसाबाहेरील दलित महिलेचा पहिला विद्रोही हुंकार

धुरंधर-65; भाऊ दाजी लाड:भारताच्या प्राचीन वारशाचा शोध घेत कुष्ठरोगावर औषध शोधून पाश्चात्यांना जबर धक्का देणाऱ्या जिद्दी तरुणाची गोष्ट

धुरंधर-64; दुर्गाबाई देशमुख:राष्ट्रसेवेची अखंड ज्योत असणाऱ्या फ्रॉकवाल्या छोट्या शिक्षिकेची निष्ठा अन् निडरपणाची गोष्ट

धुरंधर-63; वासुदेव सीताराम बेंद्रे:शिवजयंतीची तारीख निश्चित करणारा अन् शंभूराजांचे ऐतिहासिक पुनर्वसन करणारे मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्य

धुरंधर-62; गुरुवर्य केळूसकर:’दादोजी कोंडदेव अन् रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाहीत’ असे ठामपणे सांगणारा महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षी

धुरंधर-61; सी. व्ही. रामन:आकाशाचा अन् समुद्राच्या पाण्याचा रंग निळाच का? या प्रश्नाचे उत्तर प्रकाशाच्या गुणधर्मातून देणारा भौतिकशास्त्रज्ञ

धुरंधर-60; अलेक्झांडर कनिंगहॅम:काशी लगत स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्यांचा शोध लावणारा अन् बुद्धांचा भारत शोधणारा इंग्रजी लष्करी अधिकारी

धुरंधर-59; संत बंका:देव आमचाही असेल तर मंदिर का नाही? असा प्रश्न करणारे मोठ्या ग्रंथांचे नव्हे, तर मोठ्या प्रश्नांचे संत!

धुरंधर-58; अँटोनियो ग्राम्शी:तुरुंगाच्या 4 भिंतीत जग बदलण्याची शक्ती शोधणारा अन् वैचारिक क्रांती शस्त्रांपेक्षा वरचढ असल्याचे सांगणारा विचारवंत

धुरंधर-57; डॉ. श्रीराम लागू:’देवाचे अस्तित्व हीच मोठी अंधश्रद्धा’ असल्याचे ठणकावून सांगत समाजाला अस्वस्थ करणारा बुद्धिवादी माणूस

धुरंधर-56; राणी गाइदिन्ल्यू:झाशीच्या राणीची गोष्ट माहिती असणाऱ्यांना इंग्रजांना आव्हान देणाऱ्या आदिवासी कन्येची गोष्ट माहिती आहे का?

धुरंधर-55; पां. म. बापट:सशस्त्र क्रांतिकारक ते अहिंसक सत्याग्रहाचा सेनापती अन् अखेर झाडू उचलून ग्राम स्वच्छता करणारा सुधारक

धुरंधर-54; नाना पाटील:म्हार, मांगांना लांब का ठेवता? ते घान कामं करत्यात म्हणून? तुमचा डावा हातही तेच करतो, असे सांगणारा क्रांतिसिंह

धुरंधर-53; नेल्सन मंडेला:भारताला दुसरे घर मानणाऱ्या आफ्रिकन गांधींची कहाणी; 27 वर्षे कैद भोगूनही मनात कटूता न ठेवणारा मदिबा

धुरंधर-52; शकुंतला देवी:शाळेचे तोंड न पाहता संगणकाची परीक्षा पाहणाऱ्या अन् गणिताला खेळ मानणाऱ्या कानडी महिलेची जादूई कहाणी

धुरंधर-51; केशवराव जेधे:ब्राह्मणेतर चळवळीचा प्रमुख चेहरा अन् सामाजिक न्यायासाठी झगडणारा ठसकेबाज दृढनिश्चयी मराठी लढवय्या

धुरंधर-50; डॉक्टर सलीम अली:पक्ष्यांच्या जगाचे रहस्य उलगडून मानवाला निसर्गाच्या दिशेने जाण्यास प्रेरित करणारा पक्ष्यांचा ‘चालता फिरता विश्वकोश’

धुरंधर-49; सर रोनाल्ड रॉस:’साला एक मच्छर’! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक

धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण

धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा

धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय

धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका

धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक

धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका

धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची ‘झाशीची राणी’

धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक

धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा ‘बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला’ म्हणणारा शाहीर

धुरंधर-39; टी. एन. शेषन:’नेत्यांना नाश्त्यात खाणारे’ तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त

धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ

धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत – चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर

धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची ‘वीर मंगई’

धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक

धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार

धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा

धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न

धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते?

धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या ‘T शर्ट’वरील क्रांतिदूत

धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक

धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी ‘कर्नाटकची लक्ष्मीबाई’

धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक

धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ

धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे ‘देवदासी’पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार

धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; ‘1971’ ची अमर गाथा

धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही

धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा ‘धुरंधर’

धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी

धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार

धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:’शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,’ असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर

धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:’पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही’, असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर

धुरंधर-17; भगतसिंग:’बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते’, असे ठामपणे सांगणारा ‘शहीद ए आझम’

धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा

धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा ‘पेरियार’

धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर

धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे ‘जू’ काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया

धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा ‘रॉबिनहूड’, थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान

धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात ‘भूकबळी’वर नामी उपाय शोधणारा राजकारणी

धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे ‘सर्वायतन’ नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया

धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा

धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून ‘पोतराज’ प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस

धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते?

धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा ‘लेखणी’सम्राट

धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण

धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची ‘बाहुली’ ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी

धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री

धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक

धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed