डॉ. नितीन करीर यांनी पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा घेतला आढावा:आर्थिक वाढ, जीवनमान गुणवत्ता व शाश्वत विकासावर भर

0
6cf988c8-9ce1-4f8f-9f77-4065c56e9a5a_1777024231368.jpg




पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आराखड्यासाठी पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक पार पडली. राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो भवन, शिवाजीनगर येथे ही बैठक संपन्न झाली. पुणे ग्रोथ हब आराखडा जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास डॉ. करीर यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता गौतम कुमार, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अभिजीत आवटे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके आणि आयएसईजीचे संचालक शिरीष संखे उपस्थित होते. डॉ. करीर यांनी पुणे परिसरातील आर्थिक वाढ, जीवनमानाची गुणवत्ता व शाश्वत विकास या प्रमुख तत्त्वांवर आधारित पायाभूत सुविधा, उद्योग, वाहतूक, पर्यटन, कृषी व शहरी विकास आदी विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित विभागांकडून लघुकालीन व दीर्घकालीन विकास योजना, गुंतवणूक प्रस्ताव व आवश्यक सूचनांचा अभ्यास करण्यात आला. विविध विभागांच्या समन्वयाने एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. या बैठकीत पुणे ग्रोथ हब या संकल्पनेअंतर्गत पुणे जिल्ह्याच्या आर्थिक व पायाभूत विकासासाठी दीर्घकालीन आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागांचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed