दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:गॅस सिलिंडर नव्हे जिवंत बाॅम्ब, 42 अंश‎तापमानात उघड्यावर धाेक्याची वाहतूक‎

0
new-project-2026-04-24t101213463_1777005703.jpg




युद्धाचा फटका घरगुती गॅस पुरवठ्याला‎बसला आणि शहरात पॅनिक बुकिंग सुरू‎झाले. आता परिस्थिती सुधारत असल्याचा‎ दावा जिल्हा प्रशासन करत असले तरी ‎वास्तव भयावह आहे. गॅस एजन्सींकडून ‎घरपोच सिलिंडर देण्यास होणारी टाळाटाळ‎ व पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ‎जळगावकर 42 ते 43 अंशांच्या रणरणत्या ‎उन्हात चक्क दुचाकी व सायकलवर धोका‎ पत्करून गॅस सिलिंडरची वाहतूक होत आहे.‎या तापमानात अचानक दाब वाढून सिलिंडर ‎स्फोटाची भीती वाढली आहे.‎ कोल्हे हिल्स परिसरातील भारत गॅसचे‎ गोडाऊन आणि एमआयडीसीतील जळगाव ‎गॅस एजन्सी परिसरात बुधवारी ‘दिव्य‎मराठी’च्या चमूने पाहणी केली. या वेळी भर‎दुपारी उन्हात अनेक नागरिक दुचाकी,‎ सायकल, रिक्षात सिलिंडर घेऊन घरी‎ जाताना दिसले. या वेळी काही नागरिकांशी‎ संवाद साधल्यानंतर त्यांनी एजन्सीच्या‎ मनमानीचा पाढाच वाचला. बुकिंग होऊन 15 ‎दिवस उलटले आहे. एजन्सीला फोन केला‎ की गाडी येईल एवढेच उत्तर मिळते. लवकर ‎हवा असेल तर स्वतः गोडाऊन वरून घेऊन ‎जा असे डिलिव्हरी मॅनने सांगितल्याने ते ‎घेण्यासाठी आम्ही समतानगर भागातून ‎एमआयडीसीत आल्याचे सांगितले.‎ 42 अंश तापमान; स्फोटाची भीती‎ जळगावचे तापमान सध्या चाळिशी ओलांडून‎ 45 अंशांकडे जात आहे. अशा परिस्थितीत‎ दुचाकीवर सिलिंडर नेणे धोकादायक आहे.‎ तज्ज्ञांच्या मते, बाहेरील तापमान वाढल्यास ‎सिलिंडरमधील वायूचा दाब वेगाने वाढतो.‎ त्यातच दुचाकीचा अपघात झाल्यास किंवा ‎सिलिंडर रस्त्यावर आदळल्यास मोठा स्फोट‎ होऊन जीवितहानी होऊ शकते.‎ प्रशासनाचा दावा की शुद्ध फसवणूक?‎ पुरवठा विभागाने सध्या गॅसचा वेटिंग पिरियड 5 ते 6‎ दिवस असल्याचे सांगत सर्व आलबेल असल्याचा ‎दावा केला आहे; मात्र प्रत्यक्ष गोडाऊनवर येणाऱ्या‎ नागरिकांची संख्या वाढलेली आहे. 15 दिवसांपासून‎ प्रतीक्षेत असलेले ग्राहक पाहता, प्रशासनाचा हा दावा‎ फोल असल्याचे सिद्ध होत आहे. एजन्सी चालक ‎टंचाईचा बागुल बुवा उभा करून ग्राहकांना स्वतःहून ‎सिलिंडर नेण्यास प्रवृत्त करत असल्याचे चित्र आहे.‎ दिव्य मराठी एक्सपर्ट‎ डॉ. कृष्णा श्रीवास्तव, एसएसबीटी महाविद्यालय‎ तापमानात अचानक दाब वाढून‎सिलिंडरचा स्फोट होण्याचा धोका‎ दुचाकीवरून गॅस सिलिंडरची वाहतूक करणे हा‎गंभीर सुरक्षेचा प्रश्न आहे. पेट्रोलियम ॲण्ड‎ एक्स्पोझीव्हस सेफ्टी ऑर्गनायझेशन नियमाने‎ उन्हाळ्यात अशी वाहतूक धोकेदायक आहे. ‎सिलिंडर 50 ते 55 अंशांपर्यंत सुरक्षित असतात;‎पण त्यापेक्षा जास्त तापमानात दाब वाढून ‎स्फोटाचा धोका निर्माण होतो. दुचाकीवरून ‎सिलिंडर नेणे म्हणजे जीवाशी खेळणे होय.‎ हलगर्जी करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करणार घरपोच सिलिंडर देण्याचे निर्देश ‎सर्व एजन्सींना दिले आहे. सध्या युद्ध किंवा टंचाई याची अडचण राहिलेली नाही. त्यामुळे वेटिंग‎ पिरियड आता 5 ते 6 दिवसांचा आहे. नागरिकांना गोडाऊनमधून सिलिंडर नेण्याचे सांगण्यात येत‎ असेल तर अशा एजन्सींवर कारवाई केली जाईल. – महेश चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed