लिगो इंडियाच्या अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ:लिगो इंडियामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार – डॉ. मोहंती

0
new-project-2026-04-23t203826758_1776957015.jpg




हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लिगो इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पामुळे देशाला आंतरराष्ट्री‌य पातळीवर नवी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादन अणु ऊर्जा आयोगाचे सचिव तथा परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी दुघाळा (ता. औढा नागनाथ) येथे केले. दुधाळा येथील लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी (सिव्हिल) व पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन आज गुरुवार (दि.२३) रोजी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या प्रसंगी प्रकल्पाच्या साईट ऑफिस इमारतीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, डीसीएसईएमचे संचालक के. महापात्रा, आरआरसीएटीचे संचालक व्ही. पी. भनागे, आयपीआरचे संचालक डॉ. तपस गांगुली तसेच आययूकेए, पुणेचे संचालक आर. श्रीआनंद यांच्यासह संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लिगो इंडिया प्रकल्प हा गुरुत्वीय तरंगांचा शोध व अभ्यासासाठी उभारला जाणारा जागतिक दर्जाचा प्रकल्प असून, या माध्यमातून अवकाशातील सूक्ष्म कंपनांचा अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे ‘एल’ आकारातील दोन भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून, त्यामध्ये अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अत्यंत उच्च दर्जाच्या निर्वात प्रणालीमुळे अत्यल्प पातळीवरील हालचालींचे अचूक मोजमाप शक्य होणार आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग व विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारत गुरुत्वीय तरंग संशोधनात अग्रगण्य देशांच्या यादीत स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीची जागतिक स्तरावर विशेष ओळख असलेल्या ‘यलो गोल्ड’ हळदीचे बॉक्स प्रमुख अतिथींना भेट दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed