18000 CCTV Cameras Monitor 1729 Centers



राज्यात राज्य परिक्षा परिषदेकडून ता. 28 जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) घेतली जाणार आहे. या परिक्षा पारदर्शकपध्दतीने होण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार असून राज्यातील 1729 परीक्षा केंद्रांवर तब्बल 18 हजार सीसीटीव्ही कॅम

.

राज्यात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने ता. 28 जून रोजी शिक्षक पात्रता परिक्षा घेतली जाणार आहे. राज्यभरात या परिक्षेचे आयोजन करण्यात आले असून पेपर क्रमांक 1 साठी 701 परिक्षा केंद्र तर पेपर क्रमांक दोन साठी 1028 परिक्षा केंद्र उभारण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हयात या परिक्षा केंद्रावर परिक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी त्या त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या परिक्षा सुरळीत पार पडाव्यात तसेच गैरमार्गाचा अवलंब होऊ नये यासाठी सर्वच परिक्षा केंद्रावर एकूण 18 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. सर्व उमेदवारांची हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे. या शिवाय बायोमेट्रिक पडताळणी आणि फेस रेकग्निशन करण्यात येणार आहे. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटरसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.

परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित असून राज्य व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. बोगस उमेदवार, डुप्लिकेट अर्ज, मॉर्फ केलेले फोटो तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी ‘फोटो व्ह्यू’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

या परिक्षेसाठी उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. पेपर 1 साठी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत आणि पेपर 2 साठी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून ती वेळेत डाउनलोड करून घ्यावीत. परीक्षेबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *