Parbhani: Congress Veteran Suresh Warpudkar Joins BJP, Boosting Party Ahead Local Elections | परभणी बँकेवर वर्चस्व असणारे सुरेश वरपुडकर ​​​​​​​यांचा भाजप प्रवेश: काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का; शेकडो समर्थकांचाही समावेश – Parbhani News

Advertisements
Advertisements



काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व असणारे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. वरपुडकर यांच्या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. आगामी काळ

Advertisements

.

माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या सोबत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास’ या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे आवाहन या वेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. सुरेश वरपुडकर यांना प्रचंड अनुभव आहे. असे व्यक्ती आमच्याबरोबर हातात घालून नागरिकांच्या आणि जनतेच्या हितासाठी एकत्र येऊन काम करायला लागले तर येणाऱ्या काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत लाभदायक राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, मंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनीच वरपुडकर यांचे पक्षात स्वागत केले आहे. तसेच आगामी काळात परभणी जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता

मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. गोरंट्याल हे भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठा झटका मानला जाईल. विधानसभा निवडणुकीमध्ये कैलास गोरंट्याल यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर गोरंट्याल यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले असल्याची तक्रार पक्षाकडे केली होती. मात्र त्यांना पक्ष श्रेष्ठींकडून अपेक्षित अशी साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी या आधीच थेट नाराजी देखील व्यक्त केली होती. तेव्हापासूनच ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisements
  • Related Posts

    ISO status to Paladhi Khurd Gram Panchayat, certificate presented by the Guardian Minister in the review meeting of the Panchayat Samiti | कौतुक: पाळधी खुर्द ग्रामपंचायतीला आयएसओ दर्जा, पंचायत समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान‎ – Jalgaon News

    पाळधी कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांना गती द्या. दर्जेदार व मुदतीत कामे पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाळधी येथे झालेल्या धरणगाव पंचायत समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत…

    A young man committed suicide by sticking scissors into a cylinder and causing an explosion. The young man who committed suicide was a student preparing for CA. | आत्महत्या करणारा तरुण सीएची तयारी करणारा विद्यार्थी: सिलिंडरमध्ये कात्री खुपसत स्फोट घडवून तरुणाची आत्महत्या – Chhatrapati Sambhajinagar News

    महाविद्यालयातून परत आल्यावर घराचे दार बंद करून २० वर्षांच्या तरुणाने आधी पंख्याला साडी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसल्याने त्याने गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून त्याचा स्फोट केला.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *