जलजीवन, घरकुल, रोहयोत घोटाळ्यांचे आरोप; प्रशासन धारेवर:विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पैठण पंचायत समितीत बैठक, तत्काळ चौकशीची मागणी‎

0
app_177685306169e8a04541aad_1001997716.jpg



तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीत जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जलजीवन मिशन, घरकुल योजना, रोजगार हमी योजनेतील कथित घोटाळ्यांवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. रोजगार हमीतील बोगस बिले, घरकु

.

तालुक्यात पाणीटंचाई असताना केवळ पाच टँकरवर व्यवस्था सुरू असल्याचे सांगण्यात आले. आणखी गावांचे प्रस्ताव प्रलंबित असतानाही अधिकारी ठोस माहिती देत नसल्याने संताप व्यक्त झाला. भूजल अधिकारी हजर नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे सदस्यांनी सांगितले. “आता तरी जागे व्हा, नाहीतर टंचाई हाताबाहेर जाईल,” असा इशारा देण्यात आला. टँकर मंजूर होतात. पाणी मात्र गायब असल्याचा आरोपही करण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत १६६ पैकी १०१ योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करत असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अनेक गावांत कामे अपूर्ण असल्याचा आरोप झाला. दर्जा निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. रस्ते तुटल्याचे मुद्दे मांडले गेले. न झालेल्या कामांची बिले दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. ठेकेदार व अधिकारी संगनमताने कोट्यवधींची लूट झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करत तत्काळ चौकशीची मागणी करण्यात आली. ईसारवाडी, विसामांडवा आदी ठिकाणी जलजीवनची कामे बोगस असल्याचा आरोप झाला. ऑडिटची मागणी करण्यात आली. ग्रामसेवक १५-१५ दिवस गावात फिरकत नसल्याने गावकारभार ठप्प झाल्याचे सांगण्यात आले. नागरिकांची कामे रखडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला.

१६,५०० मंजूर घरकुलांपैकी केवळ २ हजार ४०० पूर्ण घरकुल योजनेत १६,५०० घरकुल मंजूर असताना २,४०० पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. ही आकडेवारी व्यवस्थेचे अपयश दाखवणारी असल्याचे जि.प. अध्यक्ष गलांडे यांनी सांगितले. स्थानिक सदस्यांनी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते ५ हजार रुपये उकळले जात असल्याचा आरोप केला. “घरकुलासाठी गरीबांची सर्रास लूट” सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

…तर गुन्हे दाखल करू बैठकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक गलांडे यांनी सांगितले की, “चार वर्षांत मोठे घोटाळे झाले. आता याची सफाई करणारच.” घोटाळे सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांन ी मनाची लाज ठेवून काम करावे, अन्यथा कठोर कारवाई अपरिहार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed