राहुल गांधी जुमलेबाज नाहीत:सुब्रमण्यम स्वामींवर कारवाईची हिंमत का नाही?; खर्गेंवरील टीकेवरून विजय वडेट्टीवारांचा भाजपला सवाल
![]()
राहुल गांधी हे काही जुमलेबाज नाहीत. त्यांची भूमिका एकच असते ज्या भागात जातील तशी भूमिका ते बदलत नाहीत. ते काही खोटं बोलत नाही. दक्षिणेत गेल्यावर एक आणि उत्तरेत एक रंग असे काही राहुल गांधी वागत नाहीत, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सरड्या प्रमाणे कोण रंग आणि ड्रेस बदलतात हे सर्वांना ठाऊक आहे, असे म्हणत अप्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा हेच वक्तव्य यापूर्वी केले आहे, त्यावर भाजप उत्तर का देत नाही. आमचे अध्यक्ष मागासवर्गीय माणूस आहे ते सत्य बोलतात त्यावेळी त्यांच्याविरोधात तुम्ही तुटून पडतात. स्वामींवर कारवाई करण्याची हिंमत तुमच्यात का नाही. स्वामींवर कारवाई का नाही? विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुब्रमण्यम स्वामी यांनी महिलांचा अपामन केला आहे. महिलांना संसदेत किंवा विधिमंडळात जायचे असेल तर पंतप्रधान यांच्याकडे जावे लागते इतके चुकीचे शब्द ते महिलांबद्दल बोलत आहे. त्यांच्यावर भाजप कारवाई करण्याची हिंमत का करत नाही. आणि आमचा मागासवर्गीय नेता सत्य बोलतो त्याच्यावर तुटून पडतात. हे भाजपचे लोकं संधीसाधू आहेत. तेव्हा काँग्रेसला श्रेय दिले होते का? विजय वडेट्टीवार म्हणाले की, 2023 मध्ये महिला आरक्षणाचे विधेयक आले, तेव्हा काँग्रेसने याला समर्थन दिले होते आणि एकमताने ते मंजूर झाले होते.तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेसला श्रेय दिले होते का? आता जे विधेयक आणले होते त्यात नारी शक्तीचा उल्लेख कुठे होता? महिला आरक्षणाची सिरियल किलर भाजपच असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ..पण आता हे प्रकरण निवळले अजित पवार यांच्या मृत्यू बाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रश्न उपस्थित केले,त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, सुनेत्रा ताईंनी ही भूमिका घेण्यास उशीर केला आहे. हा अजित दादांचा घातपात आहे का, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात होता. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर हे वक्तव्य आधी आले असते तर आगडोंब उसळला असता पण आता हे प्रकरण निवळले आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारी बाबत काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेल असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ..म्हणून यांची तोंड बंद झाली विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल त्या महिलेने महिलांचा आक्रोश काय असतो हे दाखवून दिले आहे. 10 ते 20 महिला गोळा करत नाराशक्तीच्या काय बोंबा मारताय. काल त्या महिलेने जो आवाज उठवला तो खरा महिलांचा आवाज होतो. त्या महिलेला समजले हे काही खरे लोकं नाही, केवळ मताच्या राजकारणासाठी हे सर्व सुरू आहे, म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवला. भाजपने ज्या महिला जमा केल्या होत्या त्याचा तर आवाजही निघत नव्हता. पण त्या महिलेचा खरा आवाज होता म्हणून या सर्वांना काही बोलता आले नाही. फालतूगिरीला जनता बळी पडणार नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, महिला आरक्षणाचा आणि मंजूर न झालेल्या विधेयकाचा काहीही संबंध नव्हता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही बोलायचे नाही पण केंद्र सरकारकडून तसे लिहून आल्याने त्यांना बोलावे लागत आहे, पण वस्तुस्थिती काय आहे. नारी शक्ती वंदन नाही आणि हे लोकं चंदन लावून फिरत आहे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. भाजपकडून महिला आरक्षणाच्या नावाने राजकारण सुरू आहे हे जनतेला माहिती आहे.अशा फालतूगिरीला महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही.
