Sanjay Raut Challenges CM, Deputy CM on Marathi Language Mandate in Maharashtra

0
730-x-548-2025-06-24t10203267317507405921753851943_1776833788.jpg



महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे. तामिळमध्ये राहणाऱ्या माणसाला तामिळ भाषा आलीच पाहिजे, आपण कामधंद्यासाठी जिथे जातो तिथली भाषा आलीच पाहिजे यात काहीच गैर नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत

.

संजय राऊत म्हणाले की, भाजपपणे काही कारण नसताना महिला आरक्षणाच्या नावाने मोर्चा काढला म्हणून जनता त्यांच्यावर नाराज झाली आणि महिलेचा संताप अनावर झाला. तुमचे सरकार असताना मोर्चा कसले काढत आहात? सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाविरोधी काढलेला जगातील पहिला मोर्चा आहे. ज्यांनी तो काढला त्यांचा सत्कार केला पाहिजे.

विधान परिषद निवडणुकीसाठी मविआमध्ये चर्चा

संजय राऊत म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी मविआतील 3 पक्षांमध्ये चर्चा होईल. आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. विधान परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका जाहीर केली आहे की, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तर त्यांना त्यांचा पाठिंबा आहे. आता शिवसेनेकडून विधान परिषदेवर कोणाला पाठवायचे हे पक्षप्रमुख ठरवतील. आम्ही सर्व या मताचे आहोत की शिवसेना पक्षप्रमुखांनी विधीमंडळात असायला हवे, त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले असून ते मविआचे प्रमुख नेते आहेत. ते तिथे असले तर मविआ एकसंघ आहे हे दिसून येईल. पण आता उद्धव ठाकरेंच्या मनात काय ते स्वत: जाहीर करतील.

महिला आरक्षणाला भाजपचाच विरोध

संजय राऊत म्हणाले की, महिला आरक्षण लागू करणे हे सत्ताधाऱ्याच्या हाती आहे. त्यासाठी त्यांना मोर्चा काढण्याची काय गरज आहे. 2023 मध्ये महिला आरक्षणाचा कायदा लोकसभेत मंजूर झाला आहे. 33 टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. ते लागू करायचे का नाही हे ट्रम्प की पुतीनयांना विचारायचे आहे का? असा खोचक सवाल राऊत यांनी केला आहे. आपल्याकडे देशाची सत्ता आहे आरक्षण लागू करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. भाजपचा महिला आरक्षणाला विरोध आहे, विरोधकांनी महिला आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. पण त्यांना 850 जागा केल्याशिवाय आरक्षण द्यायचे नाही.

खरातने आकडा दिला का?

संजय राऊत म्हणाले की, लोकसभेच्या 850 जागा केल्याशिवाय महिला आरक्षण लागू करण्यात येणार नाही हा विषय कुठून आला, कोणत्या घटनेत आहे. 2023 मध्ये हा कायदा मंजूर झाला त्यावेळी 850 जागांचा विषयच नव्हता. 850 जागांचा आकडा हा काय खरात बाबांनी दिला आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे. त्यामुळे हे 850 चा आकड्याला चिटकून बसले आहे. 543 मध्ये 33 टक्के आरक्षण दिला तर समतोल राहील. जागा वाढल्याशिवाय ते महिला आरक्षण देणार नाही.

मोर्चासाठी महिलांना पैसे दिले असतील

संजय राऊत म्हणाले की, जनतेने सत्ताधारी भाजपला फाट्यावर मारले आहे. काल त्यांच्या मोर्चात महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. महिलांना कळले आहे की भाजप काय आहे. त्यामुळे महिला त्यांच्यासोबत नाही. महिलांना पैसे देणं बंद झाले की महिला कोणाकडून आहेत ते समजेल. कालच्या मोर्चासाठी महिलांना 1000 रुपये दिले असतील.

महायुतीच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी संतप्त महिलेने गिरीश महाजनांना झापले

महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. “लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा,” अशा शब्दांत या महिलेने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याने मोर्च्याच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed