Mumbai Train Collision Averted at CSMT Station; Motormans Quick Action Saves Lives

0
ezgifcom-speed-3-1_1776770436.gif



मुंबईच्या गजबजलेल्या उपनगरी रेल्वे सेवेत मंगळवारी दुपारी एक मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात दुपारी सुमारे 3.18 च्या सुमारास दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका च

.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी एक जलद लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी चुकीने प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर वळवण्यात आली. त्याच वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आधीच एक दुसरी लोकल उभी होती. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही चूक घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. दोन लोकल समोरासमोर येत असल्याचे लक्षात येताच संबंधित मोटरमनने तात्काळ ब्रेक लावले. त्याच्या तत्परतेमुळे दोन्ही गाड्यांमधील अंतर अगदी कमी राहिले असले तरी संभाव्य टक्कर टळली.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ते 8 वरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबवली. त्यामुळे काही काळ स्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एकाच ट्रॅकवर आलेल्या लोकलला सुरक्षितपणे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण करण्यात आली, कारण प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते.

रेल्वे प्रवाशांचे झाले मोठे हाल

ही घटना गर्दीच्या वेळेत घडल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. जलद मार्गावरील सेवा ठप्प झाल्याने मुंबई शहरातील विविध स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर अडकून पडले, तर काहींना पर्यायी प्रवासाचा मार्ग शोधावा लागला. स्थानकांवर घोषणा करून प्रवाशांना परिस्थितीची माहिती देण्यात येत होती.

रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, सिग्नल यंत्रणेत नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला याचा सखोल तपास सुरू केला आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सुधारणा आणि उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या बॅकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही विलंबानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेतील तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks