मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून तिघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा:पेठवडगाव येथील प्रकरण

0
730-x-548-new-2026-04-20t104054326_1776662664.jpg




आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत पेठवडगाव येथे मयताच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन पंचनामा करण्यापासून रोखत मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून तिघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेेठवडगाव येथील नवनाथ लाखाडे या तरुणाने पेठवडगाव शिवारात शनिवारी सायंकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, बालाजी गोणारकर, जमादार शिवाजी पवार, राजेश घोंगडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, मयत नवनाथ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणला होता. मात्र त्याच्या आत्महत्येस नांदेड पोलिस अधिक्षक कार्यालयातील लिपीक अभिषेक सातपुते जबाबदार असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहाचा पंचनामा करू नका तसेच उत्तरीय तपासणी करू नये अशी भुमीका गावकरी व मयत नवनाथ यांच्या कुटुबियांनी घेतली होती. या मागणीसाठी गावकऱ्यांचा मोठा जमाव रविवारी ता. १९ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आला होता. आखाडा बाळापूर पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी त्यांच्ा भुमीकेवर ठाम होते. त्यानंतर रात्री उशीरा अभिषेक याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणात पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये गावातील बालाजी देवकर, सोमनाथ रणखांब, निकेश गायकवाड यांनी मयत नवनाथ यांच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन मयत नवनाथ याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी व पंचनामा करू दिला नाही तसेच मृतदेहाची अवहेलना केल्याचे नमुद केले. यावरून वरील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक बालाजी गोणारकर पुढील तपास करीत आहेत.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks