नीतेश राणे हा भाजपचा दोन फुटांचा नेता:संग्राम जगताप यांची स्वतःचे मार्केट वाढवण्यासाठी मुस्लिमांना शिवीगाळ, 'वंचित'चा आरोप

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-20t15_1776678340.png




वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे व आमदार संग्राम जगताप यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुरीत मागील 3-4 वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे, असे ते या दोन्ही नेत्यांचे नाव घेत म्हणाले. या प्रकरणी त्यांनी राणे यांचा उल्लेख भाजपचे दोन फुटांचे नेते असा केला. तर जगपात यांना ते आयटम असे म्हणाले. राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक येत्या 23 तारखेला होत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने संतोष चोळके यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यानंतर आज सुजात आंबेडकर त्यांच्या प्रचारसाठी मैदानात उतरले. यावेळी त्यांनी आमदार संग्राम जगताप व मंत्री नीतेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. वंचितने नीतेश राणेंना त्यांची जागा दाखवली ते म्हणाले, राहुरीत गेल्या तीन चार वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हिंदू – मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. एक भाजपचे दोन फुटाचा नेते आहेत नीतेश राणे. त्यांनी इथे येऊन लव्ह जिहाद विरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केले होते. ज्या चौकात त्यांनी गरळ ओकली होती, त्याच चौकात वंचित बहुजन आघाडीने सभा घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले होते. नीतेश राणे यांच्यानंतर राहुरीत भडकाऊ वक्तव्य करणारा अजून एक आयटम तयार झाला आहे. संग्राम जगताप असे त्याचे नाव आहे. तो सर्वात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाला. त्याला मते कोणी दिली तर मुस्लिमांनी दिली. मग या पठ्ठ्याचा पक्ष फुटला, अजित दादा एका बाजूला गेले. आता शरद पवार सुद्धा भाजपमध्ये जाणारच आहेत. मग संग्राम जगताप यांनी स्वतःच मार्केट वाढवण्यासाठी मुस्लिमांना शिव्या द्यायला सुरू केली. पण हा पठठ्या हे विसरला की, यांना पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष मतदारांनी, इथल्या मुस्लिमांनी मते देऊन आमदार केले होत, असे सुजात आंबेडकर म्हणाले. शरद पवार गटावर डमी उमेदवार दिल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी राहुरीतील पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व भाजपत मुख्य लढत असल्याचाही दावा केला. तसेच भाजपला पराभूत करायचे असेल, तर वंचितशिवाय पर्याय नसल्याचेही स्पष्ट केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा उमेदवार हा केवळ डमी आहे. तो भाजपच्या फायद्यासाठी उभा करण्यात आला आहे. या प्रकरणी काही आर्थिक व्यवहार आणि राजकीय समन्वय झाला असून, त्यातूनच त्यांनी उमेदवार दिला आहे. ही लढत ‘सेटिंगच्या राजकारणा’ची आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहून ‘सेटिंगच्या राजकारणा’ला नाकारावे आणि पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks