राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे बुवाबाजीला खतपाणी:बुवाबाजी विरोधी परिषदेत प्रा. श्याम मानव यांचा आरोप‎

0
240_177661124069e4efa8e0487_19buwabaji.jpg




प्रतिनिधी | अकोला सध्या बुवाबाजीवरुन अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी महायुतीवर सरकारवर टीकास्त्र डागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारकडून अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालण्यात येत असून, अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरले असा खळबळजनक आरोप प्रा. मानव यांनी केला. ते मराठा मंडळ सभागृहात पार पडलेल्या बुवाबाजी विरोधी परिषद बुवाबाजीवर सडेतोड मते मांडली. खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत प्रा. श्याम मानव यांनी बुवाबाजीवर जोरदार हल्ला चढवत खरातसारख्या भोंदू बाबांच्या कृत्यांवर गंभीर आरोप केले.विचारपीठावर शेतकरी नेते प्रकाश पोहरे, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, आमदार अमोल मिटकरी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा बोके, राष्ट्रीय प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे, अंनिसचे सहसंघटक अशोक घाटे, डॉ. सीमा तायडे, विजय कौसल, धनंजय मिश्रा, अंनिसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत तराळ, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. मिलिंद चौखडे, रमेश हिंगणकर, सौरभ वाघोडे, जिल्हा संघटक अॅड. अनिल लव्हाळे, विदर्भ संघटक किशोर वाघ, प्रतिभा भुतेकर, अॅड. रूपाली राऊत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. महिलांची होत असलेली फसवणूक, शोषण आणि अंधश्रद्धेचे जाळे याचा प्रा. मानव यांनी पर्दाफाश केला. “बुवा तिथे बाया” या विषयावर बोलताना त्यांनी नागरिकांना सावध केले. कोणताही “चमत्कार’ हा विज्ञानावर आधारित हातचलाखी असते. “ढोंगी बाबांना ओळखण्यासाठी प्रश्न विचारणे, पुरावे मागणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. आजपर्यंत अनेक बुवा-बाबांचा भंडाफोड केल्याचा उल्लेख करत त्यांनी अशा प्रवृत्तीविरोधात लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सूत्रसंचालन चंद्रकांत झटाले तर आभार प्रदर्शन जिल्हा संघटक अॅड. अनिल लव्हाळे यांनी केले. देशात हिंदू- मुस्लीम, मंदिर- मशीद अशा धार्मिक वादात लोकांना गुंतवून ठेवण्यात येत असल्याचे प्रकाश पोहरे म्हणाले. अनेकांना लोकशाही कळाली नसल्यानेच उच्चशिक्षित लोक खरातसारख्या भोंदूबाबांच्या नादी लागत असल्याचा घाणाघाती आरोप त्यांनी केला. महिलांना बनवले जाते गुलाम महिलांना भविष्य, मानसिक आधार, आजारांवर उपचार, नवस-पूजा, सांगण्याच्या नावाखाली आमिषने देण्यात येतात. त्यातूनच त्या जाळ्यात अडकतात, अशा बाबांकडून महिलांचे केवळ आर्थिकच नव्हे, तर शारीरिक शोषणही होते. अज्ञान, भीती आणि श्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांना गुलाम बनवले जाते, अशात राज्यात बुवा बापू टाकून चा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे असे प्रा. मानव म्हणाले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks