"श्रीरामपुरात डॉ. आंबेडकरांचा तीन महिन्यात भव्य पुतळा उभारणार':भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील

0
app_177639996069e1b658ef1fb_1004427126.jpg




प्रतिनधी | श्रीरामपूर श्रीरामपूरच्या जनतेला दिलेला शब्द पाळत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. आता त्याच निर्धाराने येत्या ३ महिन्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणार, अशी घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने डॉ. विखे पाटील यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी सुभाष त्रिभुवन, दीपक पटारे,बाबासाहेब चिडे, जितेंद्र छाजेड, श्रीनिवास बिहाणी, संजय फंड, नाना शिंदे, वैशाली चव्हाण, संजय गांगड,रवी पाटील, आशिष धनवटे आदी उपस्थित होते. पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, यात कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे. जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा, श्रीरामपुरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल. हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल, असेही ते म्हणाले. डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks