‘भद्रा मारुती’च्या चरणी ८०, तर घृष्णेश्वराच्या दरबारी २० हजार भाविक:गतवर्षी खुलताबादला ६० हजार, वेरूळला १५ हजार भाविक‎

0
240_63_from_center_app_177659943869e4c18e15f61_1001267885.jpg




प्रतिनिधी | खुलताबाद/वेरूळ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भद्रा मारुती मंदिरात यंदा विशेष सजावटीसोबतच भाविकांची उपस्थितीही विक्रमी ठरली. दिवसभरात अंदाजे ८० हजारांहून अधिक भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ यांनी ही माहिती देताना भाविकांच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले, तर वेरूळला घृष्णेश्वर महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४ वाजल्यापासूनच मंदिर परिसर ‘हर हर महादेव’, ‘ओम नमः शिवाय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दिवसभरात २० हजारहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने दिली. भद्रा मारुतीच्या सजावटीसाठी लागणारे आंबे छत्रपती संभाजीनगरचे अप्पा धुळे यांच्या पुढाकारातून आणण्यात आले होते. १५ हजार रुपये किमतीचे हे आंबे होते. या सजावटीची जबाबदारी संतोष बारगळ यांनी सांभाळली. सोहळ्यावेळी श्रीपाद जोशी गुरू, सुरेश गुज्जर, दत्ता इंगळे, मदन जाजू, कमलेश भाटिया आदी उपस्थित होते. वेरूळ | भाविकांसाठी पिण्याचे पाणी व वैद्यकीय पथकाची सोय केली होती. बंदोबस्तामुळे दर्शन रांग शिस्तबद्ध सुरू होती. महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांसाठी सवलत देऊन सुरळीत दर्शन करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. अनेक भाविकांनी अक्षय्य तृतीयेला केलेले दान व खरेदी अक्षय राहते, या श्रद्धेतून अभिषेक व दानधर्म केला. पुजारी दीपक शुक्ला म्हणाले, आजच्या दिवशी घृष्णेश्वराचे दर्शन घडणे हे भाग्याचे लक्षण आहे. खुलताबादला गतवर्षी सुमारे ५५ ते ६० हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. यंदा हा आकडा ८० हजारांवर गेल्यामुळे मंदिर प्रशासनासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळी ५ वाजल्यापासून ते साडेअकरापर्यंत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी गर्दीत काहीशी घट झाली होती.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks