अमरावती विद्यापीठाचे कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार, १८ नोव्हेंबरला लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. त्यानंतर २६ नोव्हेंबरला काम बंद आंदोलन केले जाईल, असे कर्मचारी महासंघाने सांगितले आहे. ५ नोव्हेंबरला कृती समितीने पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या धोरणात्मक मागण्यांवर दिवाळीनंतर मंत्रालयात वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेण्याचे लेखी आश्वासन डॉ. देवळाणकर यांनी दिले. त्यानंतर समितीने आंदोलनाच्या तारखा बदलल्या. आधी लेखणी बंद आंदोलन १३ नोव्हेंबरला आणि काम बंद आंदोलन १८ नोव्हेंबरला ठरले होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार १०:२०:३० वर्षांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करणे यांचा समावेश आहे. तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील रिक्त पदे भरण्यास तातडीने मंजुरी देणे, तसेच सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करणे, या मागण्यांसाठीही आंदोलन केले जात आहे. मंत्रालयातील बैठकीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाने दिला आहे. अजय देशमुख, अध्यक्ष आणि नरेंद्र घाटोळ, महासचिव यांनी ही माहिती दिली. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 21 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation सरकारी पोर्टलवरील माहितीने सरपंचांना ब्लॅकमेल केले:भोपाळमध्ये तीन बनावट कॉल सेंटर; 35 महिलांपैकी चार अटकेत मोर्शीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस:जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव अपर सचिवांकडे पाठवला; विभागीय चौकशीचे आदेश