बोरगावमध्ये दोन तास रास्ता रोको‎:म्हसला फाटा-अंधारी दरम्यानच्या 10 किलोमीटरची दुरवस्था झाल्यामुळे ग्रामस्थ झाले आक्रमक

0
orig_new-project-2026-04-19t071429742_1776563046.jpg




सिल्लोड तालुक्यातील म्हसला फाटा ते अंधारी या मुख्य १० किमी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी १० वाजता सिल्लोड-कन्नड हायवेवर २ तास रास्ता रोको आंदोलन केले. अनेक वर्षांपासून रस्ता खराब आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या आंदोलनामुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. म्हसला फाटा येथे सकाळी १० वाजल्यापासून शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले. आंदोलनात जि.प. सदस्य राधाकृष्ण काकडे, सुखदेव सपकाळ, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर तायडे, जगदीश कवाळ, मनोज बैनाडे, महेंद्र मोरे, जय जैस्वाल यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. लवकरच रस्ता होईल प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाचे अभियंता मंगेश डापके यांनी सांगितले. म्हसला फाटा ते अंधारी १० किमी रस्त्यासाठी नवीन प्रस्ताव तयार होत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ता होईल. पाठपुरावा सुरू आहे. यासाठी४ महिने कालावधी लागेल.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks