डायल 112 : 6 मिनिटांत रिस्पॉन्सचा दावा:पण पोलिस येतात 12 मिनिटांत, गरजूंना मर्यादित साधनसामग्रीमुळे वेळेत मदत मिळत नाही
![]()
राज्यातील पोलिस दलासाठी आपत्कालीन मदतीचा आधार असलेल्या डायल ११२ मोहिमेला शहरात अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. शहर पोलिसांच्या दाव्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोहोचण्याचा वेळ (रिस्पॉन्स टाइम) ६ मिनिटे आहे, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या अनुभवात हा वेळ १२ मिनिटांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. वाढती वाहतूक कोंडी, मर्यादित साधनसामग्री आणि विनाकारण येणारे फेक कॉल्स यामुळे पोलिसांच्या गतीला ब्रेक लागत आहे. डीजीपी अन् आयुक्तांडून तपासणी पोलिस महासंचालक सदानंद दाते व आयुक्त प्रवीण पवार यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत हे वरिष्ठ अधिकारी अचानक कॉल लिस्ट उघडून तक्रारदारांना फोन करतात. पोलिसांकडून वेळेत मदत मिळाली की नाही, याची थेट विचारणा त्यांच्याकडून केली जात असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आहे. १८ पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक वाहन १८ पोलिस ठाण्यांमध्ये एक दुचाकी, १ चारचाकी उपलब्ध आहेत. या वाहनांची संख्या वाढविण्याची गरज आहे. प्रत्येकी केवळ १ दुचाकी आणि १ चारचाकी उपलब्ध आहे. एकाच वेळी दोन कॉल आल्यास दुसऱ्या गाडीची वाट पाहावी लागते. दारू पाण्यासारखी लागते, असे कॉल्स वाढले अनेक दारुडे कॉल करून दारू पाण्यासारखी लागते आहे, दारू विक्रेत्याला अटक करा अशा तक्रारी करतात. अशा कॉल्समुळे खरंच संकटात असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना उशीर होतो. बायकोने भाजी चांगली केली नाही, चकणा चांगला नाही अशा कारणांसाठी येणाऱ्या कॉल्समुळे यंत्रणेचा वेळ वाया जात आहे. डायल ११२ : स्थिती माहिती समजून घ्या
रोजचे सरासरी कॉल्स : १५० ते १७०
सर्वाधिक कॉल्स : वाळूज, मुकुंदवाडी, सिडको, जिन्सी
उपलब्ध बळ : प्रत्येकी ठाण्यास १ दुचाकी, १ चारचाकी
पोलिसांचा दावा : ६ मिनिटे रिस्पॉन्स टाइम
प्रत्यक्ष वेळ : १२ मिनिटांहून अधिक विलंब होणार नाही रिस्पॉन्स टाइम १० मिनिटांच्या आत आणण्यासाठी रोज काम करत आहोत. काही वेळा गाडी कॉलवर असेल तर दुसऱ्या ठिकाणचे वाहन रुजू केले जाते. मदतीसाठी विलंब होणार नाही. -जयश्री कुलकर्णी, सहायक निरीक्षक, डायल ११२ फेक कॉल्स, मर्यादित वाहनांना ट्रॅफिकचे ग्रहण शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सिडको-वाळूज पट्ट्यात ट्रॅफिकमुळे पोलिसांच्या गाड्या अडकून पडतात.
