RCB vs DC Match | लाईव्ह मॅचमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! पांड्या भरमॅचमध्ये शर्मावर भयंकर ओरडला; व्हिडीओ व्हायरल
RCB vs DC Match | बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या घटनेत क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि जितेश शर्मा (Jitesh Sharma) यांच्यात गैरसमज झाल्यामुळे नाट्यमय प्रसंग घडला, ज्याचा थेट परिणाम संघाच्या धावसंख्येवर झाला.
या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 8 विकेट गमावत 175 धावा केल्या, त्यामुळे दिल्लीसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले गेले. शेवटच्या ओव्हरमध्ये लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) गोलंदाजी करत होता आणि क्रीजवर क्रुणाल पांड्या व जितेश शर्मा होते. संघाला मोठ्या धावांची गरज असताना दोघेही आक्रमक खेळ न करता एक-एक धाव घेत होते.
KRUNAL PANDYA IS RUN OUT FOR 12 OFF 10 BALLS
WHAT A DRAMATIC MOMENT IN THE GAME AS DC CONTINUE TO DOMINATE.❤️🔥#RCBvsDC pic.twitter.com/eFgPQLyeQp
— INDIAN CRICKET FC (@monk258012) April 18, 2026
तिसऱ्या चेंडूवर एनगिडीने टाकलेला बाऊन्सर वाईड गेला आणि चेंडू थेट विकेटकीपर केएल राहुल (KL Rahul) याच्याकडे पोहोचला. या परिस्थितीत धाव घेण्याची शक्यता नसतानाही जितेशने नॉन-स्ट्रायकर एंडवरून अचानक धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणताही कॉल दिला नव्हता. त्यामुळे क्रुणाल गोंधळला आणि तो क्रीज सोडताच राहुलने चेंडू एनगिडीकडे टाकत त्याला रनआऊट केले. या घटनेमुळे क्रुणालने नाराजी व्यक्त केली.
RCB vs DC Match | जितेशही बाद, RCBची धावसंख्या मर्यादित :
या प्रसंगानंतर जितेशकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. डेविड मिलर (David Miller) याने त्याचा झेल घेतला. त्यामुळे जितेशने स्वतःची विकेट गमावण्यासोबतच क्रुणालचीही विकेट घालवली, अशी चर्चा रंगली.
या शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीला केवळ 6 धावा मिळाल्या आणि त्यांची धावसंख्या 175 वरच थांबली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससमोर 176 धावांचे लक्ष्य उभे राहिले. या नाट्यमय घटनेमुळे सामना अधिक रंगतदार ठरला.
News Title: Last Over Drama RCB vs DC
