IMD Monsoon Forecast | महाराष्ट्रात पाऊस कधी व किती पडणार? महत्वाचा अंदाज समोर

0
Sayali-Gfx-2026-03-20T094818.606.webp.webp


IMD Monsoon Forecast | भारतासारख्या कृषीप्रधान देशात पावसाचं महत्त्व अत्यंत मोठं आहे. देशातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने मान्सून कसा राहतो यावर शेतकऱ्यांचं भविष्य ठरतं. दरम्यान, यंदाच्या पावसाबाबत भारतीय हवामान विभागाचा (IMD) पहिला अंदाज समोर आला असून, त्यातून चिंताजनक संकेत मिळत आहेत.

गेल्या वर्षी मान्सून लवकर दाखल झाला होता आणि अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीसह जनजीवनावर परिणाम झाला होता. काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती, तर काही ठिकाणी स्थलांतराची वेळ आली होती. दुसरीकडे, काही वर्षांत पावसाचं प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. (IMD Monsoon Forecast)

यंदा मात्र हवामान विभागाने वेगळाच अंदाज वर्तवला आहे. अल निनो (El Nino) या हवामान घटनेचा प्रभाव मान्सूनवर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशांत महासागरातील बदलांमुळे ही स्थिती निर्माण होत असून त्याचा परिणाम भारतातील पावसावर होतो. यामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या देशात वाढलेल्या तापमानामागेही याच घटकाचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे.

IMD Monsoon Forecast | जून ते सप्टेंबरमध्ये कमी पावसाची शक्यता :

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या मुख्य मान्सून कालावधीत पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहू शकतं. महाराष्ट्रातही याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता असून अनेक भागांत पावसाचं प्रमाण घटू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आव्हान उभं राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा अंदाज चिंताजनक ठरत असून, येणाऱ्या काळात परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: IMD Predicts Weak Monsoon 2026

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks