पुण्यात वकीलाकडून महिला सेक्रेटरीची हत्या:मृतदेह पोत्यात भरून ऑफिसमध्येच लपवला, कटात पत्नी अन् अल्पवयीन मुलीचाही सहभाग

0
origorigorigdownload170069666117133910371728248391_1776494468.jpg




पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या मुंढवा येथील कार्यालयात साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. सावंत यांचे पूनम यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीची पत्नी स्वाती सावंत हिला होता. याच कारणावरून गुरुवारी (16 एप्रिल) कार्यालयात वाद झाला. संतापलेल्या संजय सावंत, पत्नी स्वाती आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने पूनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पूनम यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह पोत्यात भरला हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी पूनम यांचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि तो कार्यालयातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी संधी पाहून या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन आरोपींचे होते. मात्र, तत्पूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. पोत्यात सापडला मृतदेह पूनम रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे पती दिनेश मुन यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यांनी संजय सावंत याला फोन केला असता, त्याने पूनम नातेवाइकांकडे गेली असावी, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. रात्री 11 वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेत असताना दिनेश मुन संशयावरून सावंत यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांना एक रक्ताने माखलेले पोते दिसले. ते उघडताच त्यांना पत्नीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी ॲड. संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks