एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-18t12_1776493907.png




अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. शरद पोंक्षे यांनी नांदेड येथे आयोजित परशुराम तजोत्सव व्याख्यानमालेत बोलताना उपरोक्त वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले. पूर्वी जात हा विषय नव्हता. संस्कृतीशी त्याचा कोणता संबंधही नव्हता. त्याची सुरुवात मुस्लिम आक्रमणापासून झाली. त्याला इंग्रजही तेवढेच जबाबदार आहेत. काँग्रेसने हिंदुत्वाची वज्रमूठ फोडून टाकली. आता सगळ्या जाती, आम्ही हिंदू नाही असे सांगत आहेत. त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे हे किडे सोडले आणि मुळापर्यंत जाऊन पोहोचले. हिंदुत्व कोणत्याही एका ग्रंथाशी बांधले गेले नाही. आमचा धर्मग्रंथ एक असून, ‘हे विश्वची माझे घर’ हे त्याचे ब्रीद वाक्य आहे. मोदींनी तुम्हाला जवळ का धरायचे? ते पुढे म्हणाले, धर्माच्या नावावर काही वेगळे मिळत नाही. मग मंदिरांवरच सरकारचा कंट्रोल का आहे? याविरोधात हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला जवळ का करायचे? स्वतःला सेक्युलर म्हणता, मग सरकारी पैसा हिंदू मंदिरांतून का जातो? 4 लाख हिदू मंदिरांतून पैसा सरकारी तिजोरीत जातो. मदरसे व चर्चमधून का जात नाही? या पैशांतून मुस्लिम, ख्रिश्नच लोकांचे सुद्धा कल्याण होते. 80 टक्के या गोष्टीसाठी रस्त्यावर का उतरत नाहीत? चर्च व मशिदीच्या पैशांवर सरकारचे का नियंत्रण नाही? असा सवालही शरद पोंक्षे यांनी यावेळी उपस्थित केला. सम्राट अकबराची भोंदू खरातशी तुलना शरद पोंक्षे यांनी यावेळी भोंदू अशोक खरातची तुलना मुगल सम्राट अकबराशीही केली. मुगल ए आझम चित्रपटातील अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठीच इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधाचे पात्र त्यात घुसवण्यात आले. अकबर कसा चांगला असेल? तो बायकांचे आयुष्य बरबाद करणारा होता. 1 लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल, असे ते म्हणाले. टीपू सुलतानवरही साधला निशाणा काँग्रेसने ब्राह्मणांची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानची सीरियल दूरदर्शनवर दाखवली. त्यातून टिपू सुलतान किती चांगला होता हे आमच्यावर बोडक्यावर लादण्यात आले. अटकपासून कटकपर्यंत ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, त्याचे साम्राज्य पूर्ण केले तो बाजीराव पेशवा आपल्याला माहिती नाही. त्याची सीरियलही टीव्हीवर येत नाही. त्याचा चुकीचा इतिहास आणला. 41 लढाई कसे लढला, हे सुद्धा दाखवले जात नाही. मस्तानी फक्त 17 महिने त्यांच्या आयुष्यात आली. तेवढ्यावरच त्यांनी तिला आपल्या पत्नीचा दर्जा दिला, असेही शरद पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks