Pune Crime News | पुण्यात अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट! पतीच्या प्रेयसीचा ‘असा’ काढला काटा
Pune Crime News | पुण्यातील एक धक्कादायक गुन्हा समोर आला असून अनैतिक संबंधांच्या संशयातून एका महिलेचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्यालयातच हत्या करून मृतदेह पोत्यात लपवून ठेवण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ( office crime)
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे (Pune) येथील विधी शाखेशी संबंधित ॲडव्होकेट संजय सावंत (Sanjay Sawant) यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या पूनम दिनेश मुन (Poonam Moon) या महिला सेक्रेटरी होत्या. सावंत आणि पूनम यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय सावंत यांची पत्नी स्वाती सावंत (Swati Sawant) यांना होता. या संशयावरून दोघींमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)
16 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सावंत यांच्या कार्यालयात संजय सावंत, त्यांची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने पूनम मुन यांना मारहाण केली. त्यांच्या पायांना दोरीने बांधून त्यांच्यावर बॅटने हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेह पोत्यात भरून तो कार्यालयातच लपवण्यात आला. पुढील दिवशी त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा विचार होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
Pune Crime News | पतीच्या शोधातून उघडकीस प्रकरण :
पूनम मुन गेल्या साडेतीन वर्षांपासून या कार्यालयात काम करत होत्या. घटनेच्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. दुपारी त्यांच्या पती दिनेश यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन लागला नाही. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी चिंतेतून शोध सुरू केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे पती कार्यालयात पोहोचले असता त्यांना एक पोते दिसले. संशय आल्याने त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यामध्ये पूनम यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
