[ads1]
![]()
कराड शहर पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने ३ अल्पवयीन मुलांसोबत अत्यंत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजमधील किरकोळ मारामारीच्या चौकशीसाठी या मुलांना बोलावण्यात आले होते. मुलांच्या तक्रारीनुसार, रात्री खोलीचा दरवाजा बंद करून शिवीगाळ करत विवस्त्र करण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर अश्लील चित्रफिती दाखवल्या आणि एकमेकांच्या गुप्तांगावर मारहाण करण्यास भाग पाडले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचे म्हटले आहे. बालकल्याण समितीसह पोलिस अधीक्षकांकडे तक्रार या प्रकारानंतर पीडित मुलाने व त्याच्या कुटुंबीयांनी सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि बालकल्याण समितीकडे तक्रार केली आहे. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कुटुंबाने दिला आहे. या गंभीर घटनेमुळे सातारा पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, पोलिस अधीक्षक संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad