30 किमीत पंधरा ठिकाणी महामार्गाचे‎ दुभाजक फोडत बनवले अनधिकृत रस्ते‎:धुळे-सोलापूर महामार्गावर गल्लेबोरगाव ते कन्नड घाटादरम्यान महिनाभरात 5 मृत्यू‎

महाराष्ट्र

[ads1]

देशाच्या मध्य भागातील पाच राज्यांना आणि महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ४६१ किमी लांबीचा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. कन्नड हद्दीत या महामार्गावर १५ ठिकाणी दुभाजक फोडून रस्ते के ले आहे

.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या १२४ किमी महामार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी दुभाजक तोडून अनधिकृत रस्ते तयार केले आहेत. दुभाजकामधील झाडांमुळे समोरून अचानक येणारे ट्रॅक्टर, दुचाकी व इतर वाहने दिसत नाहीत. त्यामुळे भीषण अपघात घडत आहेत. अनधिकृत रस्त्यांवर कारवाई करून ते बंद करावेत, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष इंजि. मिलिंद पाटील, नगरसेवक प्रकाश अग्रवाल, मनोज पवार, आकाश बोलधने, डॉ. सीताराम जाधव, नगरसेवक अब्दुल जावेद, रत्नाकर पंडित यांनी केली आहे. कन्नड परिसरातील अंधानेर, कन्नड आणि तिसगाव येथे बायपास पुलांचे काम संथ गतीने सुरू आहे. हे काम करारानुसार ऑगस्ट २०२६ मध्ये पूर्ण होणे बंधनकारक होते. ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. सात वर्षांपासून औट्रम घाटातील भुयारी मार्गाचे काम कागदावरच आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर प्रवासी व मालवाहतूक होत असताना अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी दुभाजक तोडून अनधिकृत रस्ते तयार केले आहेत. दुभाजकांमध्ये लावलेल्या फुलझाडांमुळे समोरून येणारे ट्रॅक्टर, दुचाकी किंवा इतर वाहने दिसत नाहीत. प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. प्राधिकरणाच्या चुकीमुळे अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी बाजार समिती संचालक प्रकाश अग्रवाल यांनी केली आहे. Q. महामार्गावर अनधिकृत रस्ते तयार केले आहेत? A . त्याचे सर्वेक्षण केले आहे. आठ दिवसांत ते बंद केले जातील. Q. काय कारवाई करणार ? A. अशा ठिकाणी पंचनामे करून गुन्हे दाखल केले जातील. Q. रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण दिसत आहे? A. महामार्गाच्या ६० मीटरच्या आत बांधकाम करता येत नाही. नोटीस बजावली आहे. Q. पुलांचे काम अपूर्ण आहे? A. अहवाल दिल्लीला पाठवला आहे. निर्णय वरिष्ठ घेतील. अंधानेर, कन्नड आणि तिसगाव येथील बायपास पुलांचे काम ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक होते. मात्र केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. गेल्या सात वर्षांपासून औट्रम घाटातील भुयारी मार्गाचे काम रखडलेलेच असल्याची स्थिती आहे. प्राजक्ता सातपुते, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

मार्गावरील तीन बायपास पुलांची कामे रखडलेली

मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

घाटमार्गाचे काम कागदावरच

मार्गावर अतिक्रमण वाढले

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *