शाळेतील शिक्षका आणि पोषण आहाराचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ हजारांची खंडणी मागणी; गुन्हा दाखल

0
ChatGPT-Image-Apr-17-2026-03_58_52-PM.jpg

इस्लापूर (प्रतिनिधी) – येथील मौजे शिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या प्रकारात सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी संजय उद्धव वाघोरे (रा. शिवणी, ता. किनवट) याने शाळेतील पोषण आहाराचे तसेच फिर्यादी महिला शिक्षिकेचे फोटो मोबाईलमध्ये काढून ते सोशल मीडियावर प्रसारित करतो, अशी धमकी देत ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी फिर्यादी महिला शिक्षिका  यांनी दिलेल्या तक्रारीवरून इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 33/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 308(2), 356(3) व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राठोड हे करत असून अधिक तपास सुरू आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks