रेडिओ24 ची राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी! भारतातील टॉप ५० रेडिओ स्टेशनमध्ये स्थान मिळविण्याचा मान नांदेड : नांदेडमधून सुरू झालेल्या Radio24 या वेब रेडिओने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, भारतातील टॉप ५० सर्वाधिक ऐकल्या जाणाऱ्या रेडिओ स्टेशनमध्ये स्थान मिळविले आहे. ही बाब नांदेडच्या डिजिटल मीडिया क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. Radio24 : https://web.radio24.in २७ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत Radio24 ने भारतातील सर्वाधिक ऐकल्या जाणाऱ्या ५० रेडिओ स्टेशनमध्ये स्थान मिळविल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, Mac आणि iPhone साठी विकसित करण्यात आलेल्या PoRaBar या रेडिओ ॲपचे डेव्हलपर Nick यांनी Radio24 च्या या यशाची माहिती देत विशेष अभिनंदन केले आहे. Radio24 हे इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील श्रोत्यांपर्यंत पोहोचणारे वेब रेडिओ स्टेशन आहे. ‘STAY CONNECTED – Kahi Bhi, Kabhi Bhi’ हे ब्रीदवाक्य घेऊन Radio24 ने मनोरंजन, संगीत, माहिती आणि विविध विषयांवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रेडिओच्या पारंपरिक माध्यमाला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देत Radio24 ने जगभरातील श्रोत्यांशी जोडले जाण्याचा प्रयत्न केला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून कुठूनही आणि कधीही रेडिओ ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यशाबद्दल Radio24 चे संस्थापक बालाजी गायकवाड यांनी श्रोते, रेडिओ टीम, आरजे आणि सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. श्रोत्यांनी दिलेले प्रेम आणि प्रतिसाद यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नांदेडमधून सुरू झालेला Radio24 चा आवाज आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचत असून, डिजिटल रेडिओ क्षेत्रात नांदेडचे नाव उंचावणारी ही कामगिरी ठरली आहे. Radio24 – नांदेडचा आवाज, जगभरातील श्रोत्यांच्या साथीला! What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 3,587 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation वातावरणातील अनिश्चित बदल आजारपणास कारणीभूत; किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका! डेंग्यू, मलेरिया आणि अन्य उष्णकटिबंधीय संसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान व उपचार आवश्यक; यशोदा हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. दुर्गेश साताळकर यांचा सल्ला..! मेंदू आणि मणक्याच्या आधुनिक उपचारांसाठी डॉ. रवनीतसिंघ छाबडा दुसऱ्या रविवारी नांदेडमध्ये