नांदेड | प्रतिनिधी

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नांदेड येथील भाग्यनगर कॉर्नर येथे त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रकाश मारावार, शहरप्रमुख मनोज यादव, अमर कोंडराज, महानगर संघटक नवज्योतसिंग गाडीवाले, शहरप्रमुख कामगार सेना नितीन सरोदे, रायेवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या विचारांसाठी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नांदेडलाइव्ह | NandedLive.com

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed