नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननावर मोठी कारवाई; 1.70 कोटींचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 70 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 17 एप्रिल 2026 रोजी पहाटे करण्यात आली.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याचे उघडकीस आले.
या कारवाईदरम्यान तीन हायवा ट्रक, एक जेसीबी, मोठी फायबर बोट, लहान इंजिन बोट तसेच मोठ्या प्रमाणात वाळू असा एकूण 1.70 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी रात्रीच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी एकूण 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये वाहन चालक व मालकांचा समावेश आहे. सर्व आरोपी नायगाव तालुक्यातील विविध गावांतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षकांनी संबंधित पथकाचे कौतुक करत अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Post Views: 71
