धक्कादायक:विवाहितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीला अटक, सोलापुरातील घटना, पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल
![]()
माहेरहून पैसे आणि दागिने आणण्यासाठी विवाहितेचा छळ करुन पतीने पत्नीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीसह आठ जणांवर विजापूर नाका पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. ही घटना लोकमान्य नगर, मजरेवाडी परिसरात बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी पतीस अटक केली आहे. जखमी नर्गीस फैजान शेख (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती फैजान, सासरा जावेद, सासू शमशाद, दीर फुरखान, जाऊ उमेरा, नणंद असिफा (सर्व मुलतानी बेकरीजवळ यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कपड्यात लपवून आणले जाळण्यासाठी पेट्रोल पती फैजान याने नर्गीसची आई आणि बहिणीला घराबाहेर काढले आणि कडी आतून लावून घेतली. त्यानंतर त्याने कपड्यांत लपवून आणलेली पेट्रोलची बाटली नर्गीसच्या अंगावर ओतून तिला लायटरने पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत नर्गीस घराबाहेर आली दरवाजा उघडताच तो घरातून पळून गेला. मात्र पेटलेल्या अवस्थेत नर्गिस घराच्या बाहेर आली.आग विझवत तीस जखमी अवस्थेत उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरु असून तीच प्रकृती गंभीर आहे, आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाइकांनी केली.
