शालेय स्पर्धा हीच प्रशासकीय सेवेची पहिली पायरी:, नगराध्यक्ष अभय आव्हाड यांचे प्रतिपादन, विवेकानंद विद्यामंदिरचे यशाचे "मंथन''
![]()
शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा या केवळ परीक्षा नसून ती राज्यसेवा व लोकसेवा स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून स्वतःच्या स्वप्नांना बळ द्यावे, असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिरमधील ५३ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंथन परीक्षेत राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर यश मिळवले. या गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. आव्हाड म्हणाले,शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांची यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी होते.विद्यार्थ्यांमध ्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होऊन चांगल्या प्रकारे यश संपादन करत आहेत.विद्यार्थ्यांनी दरवर्षी अभ्यासात सातत्य ठेवावे व आपले स्वतःचे व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या पंखांना बळ द्यावे.विद्यार्थ्यां च्या या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीमध्ये मोबाईल पासून अलिप्त राहून विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करावे तसेच मैदानी खेळ खेळावेत, असे आवाहन त्यांनी केले. शाळेतील एकूण ५३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. त्यात राज्य गुणवत्ता यादी: ८ विद्यार्थी, जिल्हा गुणवत्ता यादी: १७ विद्यार्थी, तालुका गुणवत्ता यादी: २८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या कार्यक्रमात राज्य स्तरावर चमकलेल्या विद्यार्थ्यांचा फेटे बांधून आणि शैक्षणिक साहित्य देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यात इयत्ता पहिली: शिवदीप दिलीप ठोंबरे. इयत्ता दुसरी: अवनी डांगे, तनिष्का सानप, शिया टेकाळे, आर्या हंपे, उमेर मनियार. इयत्ता तिसरी: माहिरा रईस आतार. या सोहळ्याला माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, प्राथमिक मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी, तर आभार जयश्री एकशिंगे यांनी मानले. या विद्यार्थ्यांना अनुजा कुलकर्णी, जयश्री एकशिंगे, मनिषा गायके, आशा बांदल, राधिका सरोदे, ज्योती हंपे, किर्ती दगडखैर, विद्या घोडके या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
