पैशांचा वाद; तृतीयपंथीयाने हायकोर्टातील वकिलाच्या मांडीत चाकू खुपसून ठार केले:वार करून तिघांनी आधी दाबून धरले, बेशुद्ध झाल्यावर पळून गेले
![]()
गांधेली फाटा परिसरात बुधवारी (१५ एप्रिल) रात्री वकिलाचा मृतदेह आढळून आला होता. तृतीयपंथीयांशी झालेल्या वादातूनच त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी गुन्हे शाखा व एमआयडीसी सिडको पोलिसांच्या पथकाने तिघांना अटक केली. यात सादिक बशीर अन्सारी (४०,
.
अधिक माहितीनुसार, वकील मिथुन पुंडलिक भास्कर (४९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. तेथून ते गांधेली फाटा येथे गेले. त्या ठिकाणी असलेला तृतीयपंथी सादिक यास भेटायला गेले होते. त्या वेळी त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. यातून त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यात मिथुन वरचढ ठरू लागल्याने त्याने साडीतील चाकू काढून त्यांच्या मांडीवर मारला. झुडपातून जोराने आवाज येत असल्याने व टाळ्यांच्या आवाजाचे सिग्नल ऐकून दोन साथीदार आत गेले. मिथुन मोठ्याने ओरडत असल्याने व त्यांच्या मांडीतून अधिकचा रक्तस्राव सुरू असल्याने तिघांनी मिळून त्यांना तेथेच दाबून धरले. त्यानंतर काही वेळाने त्यांना अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने भोवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला टाकून तिघांनी पळ काढला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्याने त्यांनी पोलिसांना कळवल्याने त्यांना घाटीत हलवण्यात आले. त्या वेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
भावाचा मर्डरशी संबंध नाही, बहीण गर्दीत शिरलीच नाही
सायंकाळी सात वाजेपासून मिथुन घराच्या बाहेर पडले होते. त्यांनी पत्नीला १० मिनिटांत परत येतो, असे कळवले होते. मात्र १० वाजूनही परत न आल्याने व त्यांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबाने एकमेकांकडे विचारपूस सुरू केली होती. गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) कार्यरत असणाऱ्या त्यांच्या भगिनी मथुरा भाचीसह त्यांच्या शोधासाठी घराच्या बाहेर पडल्या. त्यांनी ब्लॅक हॉर्स हॉटेलच्या समोरच्या बाजूला गर्दी पाहिल्यावर तेथे विचारपूस केल्यावर तेथील लोकांनी मर्डर झाल्याचे सांगितले. मात्र आपल्या भावाचा मर्डरशी संबंध नाही म्हणून त्यांनी गाडी माघारी फिरून नेली. पुढे गेल्यावर त्यांना भावाच्या मित्राचा फोन आल्यावर त्याने हकीकत सांगितल्यावर त्या भाचीला घरी सोडून घटनास्थळी गेल्या.
सादिक गुरूकडे जाऊन लपला
आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आल्याने सादिक याने शिवाजीनगर भागात राहणाऱ्या गुरूला तेथूनच संपर्क केला. त्यानंतर तो गुरूकडे जाऊन लपला. रात्री पोलिसांनी त्या भागात उभे राहणाऱ्या तृतीयपंथीयांच्या नेटवर्कचा शोध घेतल्यावर तो शिवाजीनगर भागात आढळला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर अन्य दोन साथीदारांचा ठावठिकाणादेखील कळवला. त्यानुसार सहायक निरीक्षक भारत पाचोळे, अर्जुन कदम, जगन्नाथ मेनकुदळे यांच्या पथकाने दोघांनाही अटक केली.
झाल्टा फाटा ते गांधेली फाटा या संपूर्ण परिसरात तृतीयपंथीयांचे रात्रीचे खेळ सुरू असतात. त्या ठिकाणी परराज्यातून येणारे ट्रक चालक, परजिल्ह्यातून बाजारात आलेले चालक यांना ते टार्गेट करतात. त्यांना झुडपात घेऊन गेल्यावर त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. त्यानंतर बाहेर असलेल्या दोघांना टाळी वाजवून आत येण्याचा इशारा दिला जातो. त्यात लागलीच अन्य काही साथीदार त्यांना आत येऊन लुटतात. मात्र अनेक जण याची तक्रार करत नाहीत.
पोलिस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू
छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. यानुसार तृतीयपंथी आणि इतर गटांना विनानिमंत्रण लोकांच्या घरी, कार्यक्रमात जाऊन किंवा ट्रॅफिक चौकात सक्तीने पैशांची मागणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश १५ एप्रिल ते १३ जून २०२६ पर्यंत लागू राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई होईल.
