Redmi A7 Pro 5G | कमी बजेटमध्ये Redmi चा भन्नाट ‘प्रो’ स्मार्टफोन भारतात लॉन्च! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Redmi A7 Pro 5G | Xiaomi कंपनीने भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi A7 Pro 5G लॉन्च केला आहे. रेडमी A-सीरिजमधील हा पहिलाच ‘प्रो’ मॉडेल असून कंपनीने ‘King of Power and Style’ या टॅगलाईनसह त्याचा प्रचार सुरू केला आहे.
हा स्मार्टफोन कमी किमतीत मोठा डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीसारखी फीचर्स देतो, त्यामुळे बजेट सेगमेंटमध्ये तो आकर्षक पर्याय ठरू शकतो.
Redmi A7 Pro 5G दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे:
4GB RAM + 64GB स्टोरेज – ₹11,499
4GB RAM + 128GB स्टोरेज – ₹12,499
हा फोन ब्लॅक, मिस्ट ब्लू आणि सनसेट ऑरेंज या रंगांमध्ये उपलब्ध आहे. 15 एप्रिलपासून Flipkart आणि शाओमीच्या अधिकृत स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
Redmi A7 Pro 5G | डिस्प्ले आणि परफॉर्मन्स :
फोनमध्ये 6.9 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स ब्राइटनेस आहे. या सेगमेंटमध्ये हा सर्वात मोठा आणि स्मूथ डिस्प्ले असल्याचा कंपनीचा दावा आहे. (Redmi 5G Smartphone Under 12000)
परफॉर्मन्ससाठी 6nm ऑक्टा-कोर Unisoc T8300 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत 4GB RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते. फोन Android 16 आधारित HyperOS 3 वर चालतो.
कॅमेरा आणि AI फीचर्स :
Redmi A7 Pro 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे:
32MP प्रायमरी कॅमेरा
सेकंडरी कॅमेरा (Redmi A7 Pro 5G Camera)
सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय Google Gemini आणि Circle to Search सारखी AI फीचर्सही यात मिळतात.
या फोनमध्ये 6300mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. तसेच 7.5W रिव्हर्स चार्जिंगची सुविधा असल्यामुळे इतर डिव्हाइसही चार्ज करता येतात.कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C पोर्ट दिला आहे. फोन IP52 रेटिंगसह येतो, त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून काही प्रमाणात संरक्षण मिळते.
