महापुरुषांना जातीत अडकवू नका, त्यांचे विचार स्वीकारा:राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये पानसरे महाविद्यालयाचे डॉ. सिद्धोधन कांबळे यांचे प्रतिपादन
![]()
आपल्या अज्ञानामुळे आपण संत आणि महापुरुषांना जातींमध्ये विभागले आहे. त्यांना या जातींच्या विळख्यातून मुक्त करा आणि त्यांचे प्रगत विचार स्वीकारा. तरच आपली आणि देशाची खरी प्रगती होईल,” असे परखड प्रतिपादन अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयाचे डॉ. सिद्धोधन
.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. नानासाहेब पवार सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. विलास खर्चे हे होते. व्यासपीठावर संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, कृषी तंत्रज्ञानाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, प्रक्रिया अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते.
डॉ. सिद्धोधन कांबळे यांनी महापुरुषांच्या जीवनातील संघर्षाचे दाखले देत सांगितले की, “महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या वाट्याला जो अपमान आला, तसा तो भविष्यात कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी समाजपरिवर्तन घडवले. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाची दारे उघडली, म्हणूनच आज सामान्य माणूस स्वाभिमानी आणि ज्ञानी झाला आहे.”
कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची जी तत्वे दिली, ती अंगी बाळगणे हीच काळाची गरज आहे. कृषी संशोधनाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचवता येईल, याचा विचार शास्त्रज्ञांनी आणि विद्यार्थ्यांनी करावा. महापुरुषांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन संशोधनातून देशाची प्रगती साधा.प्रास्ताविक विद्यार्थी डॉ. कैलास कांबळे यांनी, गत व पाहुण्यांची ओळख डॉ. विलास आवारी यांनी करुन दिली. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रथमेश निंगनुरे आणि अनिकेत सरपने यांनी, तर आभार ऋषिकेश मोरे यांनी मानले.
