पाण्याचे आवर्तन मिळाल्याने श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा:एक ते दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होणार, उन्हाळ्यात टंचाईवर मात
![]()
श्रीरामपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात थोडेच पाणी शिल्लक राहिल्याने श्रीरामपूरवर पाणी कपातीचे संकट ओढवले होते. जलसंपदा विभागाकडून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला आहे. भंडारदरा, निळवंडे धरणातून पाणी पुरवठ
.
श्रीरामपूर नगरपालिका सुमारे १.२५ लाख लोकांना पाणीपुरवठा करते. ४५ दिवसांनी पाण्याचे आवर्तन येते हे गृहीत धरून नगरपालिकेने गोंधवणी येथे ३७५ दशलक्ष लिटर क्षमतेचा सिमेंटचा पक्का व मिल्लतनगर येथे मातीचा ४५० दशलक्ष लिटर क्षमतेचे साठवण तलाव आहे. पाणी मातीच्या तलावाचे खोलीकरण, विस्तारीकरण आणि अस्तरीकरण काम सुरू असल्याने सध्या एकाच तलावात ३७५ दशलक्ष लिटर पाणी साठवले जाते. नवीन तलावाचे काम पूर्ण झाल्यास १ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे. दररोज सुमारे दोन कोटी लिटर पाणी शुद्ध करता येईल, असा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे.
नगरपालिका दररोज सुमारे दोन कोटी लिटर पाणी पुरवठा करीत आहे. सध्या एकच साठवण तलाव वापरात असल्याने पाणी साठवण क्षमता कमी आहे. सुमारे ४५ दिवसांनी आवर्तन येत असल्याने तोपर्यंत पाणी जपून वापरण्याची श्रीरामपूर नगरपालिकेला कसरत करावी लागत आहे. सध्या शहरात पाणी टंचाई जाणवत असून थोड्या वेळ का होईना पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, आता पाणी आल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान जितेंद्र छाजेड, गटनेते वैशाली चव्हाण, स्नेहल खोरे, जयश्री पाटील, रवी पाटील, दीपक चव्हाण, आशीष धनवटे, केतन खोरे, संजय गांगड, सिद्धार्थ फंड, मनोज लबडे, विशाल अंभोरे, अमोल शेटे, कार्तिक मंडवे आदींनी विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. पाण्याचे आवर्तन आल्यानंतर सुरुवातीला अतिशय अस्वच्छ पाणी येते. त्यामुळे ते लगेचच साठवण तलावात घेता येत नव्हते. त्यामुळे काही तास पाणी वाहू द्यावे लागते मग साठवण तलावात घेता येते. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास पाणी साठवण तलावात घेण्यात आले.
जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जलशुद्धीकरण केंद्रात खाली गाळ साठल्याने नळाला गाळ मिश्रित पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पाणी पुरवठा अधिकारी निलेश बकाल यांचेशी संपर्क साधला असता सदरचा गाळ काढला असल्याचे सांगितले आहे.
